Team Agrowon
कलिंगड लागवड २५ फेब्रुवारीपर्यंत करता येते.
आळे पद्धत, सरी-वरंबा पद्धत, रुंद गादी वाफा पद्धत आणि मल्चिंग पेपर तंत्रज्ञानाचा वापर करुन कलिंगडाची लागवड केली जाते.
लागवडीसाठी कमी पाण्यावर व अल्प कालावधीत येणाऱ्या जातींची निवड करणे गरजेचे आहे. यामध्ये शुगर बेबी, मधू, अर्का माणिक, मिलन, अमृत, अर्काज्योती, अर्का राजहंस,अर्का जीत या जातींचा समावेश होतो.
मल्चिंग पेपरचा वापर करुन कलिंगड पिकाची लागवड करता येते.
रुंद गादीवाफ्याच्या दोन्ही बाजूंना लागवड केली जाते. त्यामुळे वेल गादीवाफ्यावर पसरतो व फळे पाण्याच्या संपर्कात येऊन खराब होत नाहीत
कलिंगड लागवडीसाठी सुधारित तंत्राचा वापर करुन योग्य लागवड पद्धत निवडावी.