
Paddy Procurement धान उत्पादक शेतकऱ्यांनी (Paddy Farmer) हमीभाव केंद्रावर (MSP Procurement) विकलेल्या धानाचे चुकारे (Paddy Payment) थकले आहेत. हे ६०० कोटी रुपयांपेक्षा अधिकचे चुकारे त्वरित करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनातून ही मागणी करण्यात आली आहे. निवेदनानुसार, जिल्ह्यात खरीप हंगामातील धान खरेदीसाठी अत्यल्प उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी हमीभावाने धान विक्रीपासून वंचित राहतील.
या शेतकऱ्यांना दिलासा म्हणून अनुदानात्मक रकमेची तरतूद करण्याची गरज आहे. खरीप हंगामातील धानाची लागवड व कृषी विभागाने निश्चित केलेली उत्पादकता अपेक्षित धरून जिल्ह्याला अवघे ५० लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट अपेक्षित होते.
परंतु त्यात कपात करून ते अवघे ३९ क्विंटल करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी ई-पीक नोंदणी केली; पण अनेक शेतकऱ्यांच्या सातबारात तशी नोंदच झाली नाही.
त्यामुळे अत्यल्प उद्दिष्टाच्या परिणामी अनेक शेतकऱ्यांना हमीभावाने धान विक्री शक्य होणार नाही. त्यांना कमी दरात धान विकावा लागणार आहे. त्यासोबतच राज्य शासनाने प्रति हेक्टरी १५ हजार रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. बोनसची ही रक्कम फारच कमी असून याद्वारे शेतकऱ्यांची थट्टाच शासनाने केली आहे.
हा निर्णय मागे घेत बोनससाठी प्रति क्विंटल एक हजार रुपयांची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, नरेश माहेश्वरी, राजलक्ष्मी तुरकर, डॉ. अविनाश काशीवार, सी. के. बिसेन, केतन तुरकर, सुनील पटले, शैलेश वासनिक, नागरतन बन्सोड, आरजू मेश्राम, कपिल बावनथडे, योगी येडे, रौनक ठाकूर यांनी केली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.