औरंगाबाद : वीजचोरीमुळे (Electricity Theft) नियमित वीजबिल (Electricity Bill) भरणाऱ्या प्रामाणिक वीज ग्राहकांवर (Electricity Customer) वीज दरवाढीचा बोजा पडतो. त्यामुळे महावितरणने (MSEDCL) वीजचोरी करणाऱ्यांविरोधात कारवाईची बडगा उगारला आहे. त्यानुसार महावितरणच्या भरारी पथकांनी एप्रिल ते जून-२०२२ या तीन महिन्यांच्या काळात वीजचोरीची तब्बल १३१ कोटी ५० लाखांची २ हजार ६२५ प्रकरणे उघडकीस आणली आहेत.
वीजचोरांविरुद्ध अतिजलद कारवाई करण्यासाठी विभागीय स्तरावर आणखी दहा नवीन भरारी पथकांची स्थापना करण्याचे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिले आहेत. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी नुकतीच सुरक्षा व अंमलबजावणी विभागाची आढावा बैठक घेतली. या वेळी श्री. सिंघल म्हणाले, की महावितरणची आर्थिक घडी सुधारण्यासाठी सर्वकष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वीजचोरी करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे भरारी पथकांनी अधिक सक्षमपणे काम करून वीजचोरीस लगाम घालावा.
या बैठकीस सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे कार्यकारी संचालक (प्रभारी) कमांडर (सेवानिवृत्त) शिवाजी इंदलकर यांच्यासह सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सध्या महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागात ६३ भरारी पथकांसह आठ अंमलबजावणी युनिट्स कार्यरत आहेत. औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयालयात - १२ भरारी पथके कार्यरत आहेत. त्यात नोव्हेंबर-२०२१ पासून विभागीय कार्यालय स्तरावर सुरू करण्यात आलेल्या २० भरारी पथकांचा समावेश आहे. प्रत्येक भरारी पथकाने दर महिन्याला वीजचोरीची जवळपास २० प्रकरणे उघडकीस आणली आहेत.
औरंगाबाद विभागात इतका दंड केला वसूल
या भरारी पथकांनी चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल, मे आणि जून या प्रथम तिमाहीत वीजचोरीची २३९.५८ दशलक्ष युनिटच्या वीजचोरीची तब्बल २ हजार ६२५ प्रकरणे उघडकीस आणून, वीजचोरांकडून सुमारे ५४ कोटी १६ लाख ६६ हजारांचा दंड वसूल केला आहे. उर्वरित बिलांची रक्कमही लवकरात लवकर संबंधितांकडून वसूल करण्यात यावी, असेही निर्देश श्री. सिंघल यांनी दिले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.