Fertilizer Adulteration : भेसळयुक्त खते शोधण्यासाठी कृषी केंद्रे तपासणीचे आदेश

सोलापूर जिल्ह्यात चक्क मिठाची भेसळ करून विक्री होत असलेल्या विद्राव्य खतातील (१२ः६१ः०) भेसळीचे प्रकरण ‘सकाळ-अॅग्रोवन’ने गेल्या चार-पाच दिवसांपासून वृत्तमालिकेद्वारे लावून धरल्यानंतर कृषी विभाग ‘अॅक्शन मोड’वर आला आहे.
Fertilizer
FertilizerAgrowon
Published on
Updated on

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात चक्क मिठाची भेसळ (Salt Adulteration In Fertilizer) करून विक्री होत असलेल्या विद्राव्य खतातील (१२ः६१ः०) भेसळीचे प्रकरण ‘सकाळ-अॅग्रोवन’ने गेल्या चार-पाच दिवसांपासून वृत्तमालिकेद्वारे लावून धरल्यानंतर कृषी विभाग ‘अॅक्शन मोड’वर (Agriculture Department On action Mode) आला आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे (Balasaheb Shinde) यांनी जिल्हा गुणनियंत्रण विभागाच्या अधिकारी आणि भरारी पथकासह जिल्ह्यातील सर्वच तालुका कृषी अधिकाऱ्यांची या विषयावर स्वतंत्रपणे बैठक घेत कृषी केंद्रांची तपासणी करा, खतांचे नमुने घ्यावे, प्रयोगशाळेत चाचण्या करा करावी, तसेच किती नमुने घेतले, किती तपासणीला पाठवले, याबाबतचा सविस्तर अहवाल येत्या ३० जुलैपर्यंत देण्याचे आदेशही दिले आहेत.

खरीप हंगामातील पिकांसह भाजीपाला आणि फलोत्पादनामध्ये महत्त्वाच्या असणाऱ्या विद्राव्य खताच्या (Soluble Fertilizer) खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असताना, बोगसखत (Bogus Fertilizer) विक्रेत्यांच्या टोळ्यांनी सोलापूर जिल्ह्यात तोंड वर काढले आहे. नामवंत ब्रॅण्ड्च्या नावावर भेसळयुक्त खतांची (Adulterate Fertilizer) विक्री करून शेतकऱ्यांना गंडवण्याचे काम सुरू आहे. याबाबत ‘अॅग्रोवन’ने ‘शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ’ ही वृत्तमालिका प्रसिद्ध केली. तेव्हा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी तातडीने गुणनियंत्रण अधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील सर्वच तालुका कृषी अधिकारी, तंत्र अधिकारी आणि पंचायत समित्यांच्या कृषी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्ह्यात सलग पाच दिवस (२५ ते २९ जुलैपर्यंत) कृषी केंद्रांची तपासणी करण्याची सूचना केली आहे.

Fertilizer
Bogus Fertilizer : बोगस खत प्रकरणी दिखाव्यापुरती कारवाई नको

तसेच युद्धपातळीवर मोहीम म्हणून हा कार्यक्रम राबवावा, मुख्यतः विद्राव्य खतांचे (पाण्यात विरघळणारे) सर्व ग्रेडचे विविध कंपनीनिहाय खतांचे नमुने काढून तपासणी करावी, तसेच प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवा, असे आदेश दिले. शिवाय हे नमुने कशा पद्धतीने घ्यावेत, यासाठीही एका फॉर्मचा नमुना त्यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. त्यात संबंधित कृषी केंद्रांकडे ग्रेडनिहाय एकूण उपलब्ध साठा किती आहे, उत्पादन कुठून आयात केले, किती नमुने घेतले, त्याचा तपशील नोंदवण्यास सांगितले आहे.

Fertilizer
Fertilizer : कायद्यातील पळवाटा भेसळखोरांच्या पथ्यावर

पहिल्याच दिवशी आठ नमुने फेल

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, त्यानुसार तपासणी मोहीम सुरू झाली आहे. स्वतः जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी मोहोळ, मंगळवेढा तालुक्यांत तपासणी केली. तपासणीच्या पहिल्याच दिवशी खताचे ४० नमुने अधिकाऱ्यांनी घेतले. ते पुण्याच्या शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यापैकी नऊ नमुने पास झाले, तर आठ नमुने फेल ठरले. उर्वरित २३ नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे.

Fertilizer
Salt ची भेसळ करून विद्राव्य Fertilizer विकण्याऱ्या टोळीचा पर्दाफाश ? | ॲग्रोवन

भेसळखोरांविरुद्ध आता अक्कलकोटमध्ये गुन्हा

मोहोळ आणि उत्तर सोलापुरात खत भेसळीचे दोन गुन्हे या आधीच दाखल झाल्यानंतर आता अक्कलकोट तालुक्यातही असाच प्रकार उघडकीस आला आहे. खानापूर येथील शेतकरी रविकांत कुरे यांनी त्यांच्याकडील तूर आणि उसाला नामवंत कंपनीचा युरिया आणि १०ः२६ः२६ हे खत वापरूनही तूर आणि उसाला फरक पडला नसल्याची तक्रार कृषी विभागाकडे केली. तसेच ही सर्व खते सिद्धाराम मोत्याप्पा लगळी (रा. तडवळ, ता.अक्कलकोट) यांच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले. त्यानंतर जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी अशोक मोरे, तालुका कृषी अधिकारी रामचंद्र माळी आणि पंचायत समितीचे कृषी अधिकारी उमेश काटे यांनी कुरे यांच्या शेतात भेट देऊन त्यांच्याकडील तूर, उसाची तसेच खताची तपासणी केली. तेव्हा हा खत पाण्यात विरघळत नसल्याचे आढळले. त्यामुळे विनापरवाना खत विक्री आणि बनावट खताबाबत सिद्धाराम लगळी याच्याविरुद्ध कृषी अधिकारी उमेश काटे यांनी अक्कलकोट पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

मोहोळ प्रकरणात संशयिताला जामीन

मोहोळ येथे उघडकीस आलेल्या भेसळ खत प्रकरणातील संशयित वैभव काळे (रा. मोहोळ) व राहुल शेंडगे (रा. ढोकबाभुळगाव, ता. मोहोळ) या दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली होती. पण त्यांना आता जामीन मिळालेला आहे. याबाबत मोहोळ पोलिस ठाण्याचे तपास अधिकारी शरद ढावरे यांना विचारणा केली असता, न्यायालयात आम्ही या संशयितांना जामीन मिळू नये, यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी विविध दहा कारणेही दिली. संशयितांची आम्हाला आणखी चौकशी करावयाची असल्याने पोलिस कोठडी मागितली. पण न्यायालयाने ती मान्य केली नसल्याचे सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com