Kharip Sowing
Kharip SowingAgrowon

Kharip Sowing: नागपूर जिल्ह्यात ५९ टक्केच पेरणी

यंदा २ लाख ९ हजार हेक्टरमध्ये कापसाची लागवड होण्याचा अंदाज आहे. आतापर्यंत १ लाख ७१ हजार हेक्टरमध्ये पेरणी (Kharip Sowing) झाली आहे. मागील काही वर्षांतील कापसावरील बोंडअळीच्या प्रादुर्भावानंतर जिल्ह्यातील कापसाचे क्षेत्र सात ते आठ हजार हेक्टरने घटले आहे.
Published on

नागपूर : जिल्ह्यात अद्याप पाऊस (Rain) समाधानकारक झालेला नाही. त्याचा परिणाम पेरणीवर झाला आहे. आतापर्यंत फक्त ५९ टक्केच क्षेत्रावर पेरण्या (Kharip Sowing) झाल्या आहेत. पेरण्यांना होत असलेल्या विलंबाचा परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गेल्या वर्षी कापसाला (Cotton) चांगला भाव मिळाल्याने यंदा त्याच्या क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज आहे. यंदा २ लाख ९ हजार हेक्टरमध्ये कापसाची लागवड होण्याचा अंदाज आहे. आतापर्यंत १ लाख ७१ हजार हेक्टरमध्ये पेरणी (Kharip Sowing) झाली आहे.

मागील काही वर्षांतील कापसावरील बोंडअळीच्या प्रादुर्भावानंतर जिल्ह्यातील कापसाचे क्षेत्र सात ते आठ हजार हेक्टरने घटले आहे. परंतु कापसाला चांगला भाव मिळाल्याने जिल्ह्यात पुन्हा कापसाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज कृषी विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

कापसाच्या खालोखाल सोयाबीनचे (Soybean) क्षेत्र आहे. सोयाबीन १ लाख १० हजार हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे. आतापर्यंत ६६ हजार हेक्टर क्षेत्रात त्याची पेरणी झाली आहे. तर तुरीची ५३ हजार हेक्टर पैकी ४० हजार हेक्टरमध्येच पेरणी (Kharip Sowing) झाली आहे. इतर पिकांच्या पेरणीचा टक्काही कमी आहे. पावसाला झालेल्या विलंबाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. खरीप हंगामातील पेरणीला विलंब झाल्याने त्याचा रब्बी हंगामावरही परिणाम होणार आहे. रब्बीमधील पेरणीस विलंब होणार असल्याचे सांगण्यात येते.

सोयाबीन उगवले नसल्याच्या तक्रारी

कुही, भिवापूर तालुक्यांत सोयाबीनचे (Soybean) पीक उगवलेलेच नाही. सोयाबीनचे बियाणे योग्य नसल्याने ते उगवले नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी राजानंद कावळे यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com