Ajit Nawale
Ajit NawaleAgrowon

Wet Drought : ओला दुष्काळ प्रश्नी २७ ऑक्टोबर रोजी ऑनलाईन ट्रेंड मोहीम

ओला दुष्काळ व त्या संबंधीच्या मागण्यांची पोस्टर्स व पोस्ट दिनांक २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते रात्री ११ या काळात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करून या प्रश्नांबाबत मोठी जागृती निर्माण करणे व सरकारला ओल्या दुष्काळाबाबतच्या मागण्या मान्य करायला भाग पाडणे असा या ऑनलाईन ट्रेंडचा उद्देश आहे.

प्रिय बंधू आणि भगिनींनो !

 परतीच्या पावसाने महाराष्ट्रभर शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने दिलासा मिळावा यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी पुत्रांनी उद्या दिनांक २७ ऑक्टोबर रोजी ऑनलाईन ट्रेंड आयोजित केला आहे.

ओला दुष्काळ व त्या संबंधीच्या मागण्यांची पोस्टर्स व पोस्ट दिनांक २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते रात्री ११ या काळात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करून या प्रश्नांबाबत मोठी जागृती निर्माण करणे व सरकारला ओल्या दुष्काळाबाबतच्या मागण्या मान्य करायला भाग पाडणे असा या ऑनलाईन ट्रेंडचा उद्देश आहे.

Ajit Nawale
Maharashtra Politics : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री करणार राज्याचा दौरा

राज्यभरातील संवेदनशील बुद्धिजीवी, लेखक, कवी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते या मोहिमेत सामील होत आहेत.

आपण व आपल्या संघटनेने या मोहिमेला पाठिंबा द्यावा व आपल्या सोशल मोडिया सेलला हा ट्रेंड यशस्वी करण्याबाबत सूचना कराव्यात अशी आपणास आग्रहाची विनंती करत आहोत.

आपण काय करू शकता ?

 - असा ट्रेंड होणार आहे हे आपण सर्वांना सांगावे.

दिनांक २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते रात्री ११ या काळात Twitter, WhatsApp, Facebook अशा सोशल मीडियावर आपण आपल्या account वरून ओल्या दुष्काळा संबंधित शेतकरी मागण्यांच्या वेगवेगळया पोस्ट मोठ्या प्रमाणात टाकाव्यात.

मित्र, मैत्रिणी, समर्थक व संघटनेच्या कार्यकर्त्यांनाही असे करायला सांगावे.

ट्रेंड दिवसभर चालणार असला तरी आपल्याला सकाळी ११ ते १ या काळात अधिकाधिक पोस्ट टाकायच्या आहेत.

ट्रेंड करायचा आहे त्या विषयाचे पोस्टर ग्रुपवर मिळतील. आपणही आपल्या नावाचे, संघटनेच्या नावाने पोस्टर बनवून वापरू शकता.

दिनांक २७ ऑक्टोबर रोजी सकाळी हॅशटॅग घोषित केला जाईल तो प्रत्येक पोस्टच्या खाली जोडावा. 

 खालील Twitter handle  सर्व पोस्ट्स बरोबर टॅग करावेत.

@mieknathshinde

@cmomaharashtra

@Dev_Fadnavis 

@AbdulSattar_99

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com