MEDA Kusum Scheme : ‘कुसुम’ मधील सौरपंपांचा जिल्हानिहाय कोटा वाढणार

Solar Pump Subsidy : ‘मेडा’चे महासंचालक रवींद्र जगताप ः २३ हजार अर्ज दाखल
  MEDA kusum Scheme
  MEDA kusum Scheme
Published on
Updated on

ॲग्रोवन वृत्तसेवा
Pune News : ‘‘मेडा’च्या कुसुम योजनेला (MEDA Kusum Scheme) शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे एकाच वेळी अनेक शेतकरी ऑनलाइन अर्ज दाखल करत आहेत. परिणामी, संकेतस्थळ संथ होऊन अर्ज दाखल होण्यास विलंब होत आहे.

इच्छुक सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता यावा म्हणून दररोज संकेतस्थळाचा आढावा घेण्यात येत आहे. तसेच शेतकऱ्यांची वाढती मागणी पाहता जिल्हानिहाय कोटा वाढविण्यात येत आहे,’’ अशी माहिती ‘महाऊर्जा’चे (मेडा) महासंचालक रवींद्र जगताप यांनी दिली.

शेतीच्या शाश्‍वत सिंचनासाठी विजेला पर्याय म्हणून महाऊर्जाच्या (मेडा) वतीने अपारंपरिक ऊर्जास्रोतांच्या वापराला प्रोत्साहन दिले जाते.

या प्रोत्साहनपर योजनेतील सौरऊर्जेवरील शेतीपंपांसाठीच्या कुसुम योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांनी आतापर्यंत २३ हजार ५८४ अर्ज ऑनलाइन पद्धतीने दाखल केले आहेत.

यामध्ये पुणे जिल्ह्यात सर्वाधिक २ हजार ६०२ अर्ज दाखल झाले आहेत. तर सर्वांत कमी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि ठाणे जिल्ह्यांत केवळ प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाला आहे.

  MEDA kusum Scheme
कुसुम सौरऊर्जा प्रकल्पातून शेतकऱ्यांना उत्पन्नाची संधी

या योजनेअंतर्गत दरवर्षी १ लाख सौरपंप वितरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या वर्षी १७ मे २०२३ पासून सुरू करण्यात आलेल्या नोंदणीमध्ये २३ हजार ५८४ अर्ज दाखल झाले आहेत. ही योजना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या धर्तीवर आहे.

सर्वसाधारण गटासाठी ९० टक्के, तर अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी ९५ टक्के अनुदान देण्यात येते.

  MEDA kusum Scheme
PM Kusum Scheme : ‘कुसूम’मधील सौरपंपांच्या अर्जांसाठी शेतकऱ्यांची दमछाक

सौरपंपाची क्षमता, दर, लाभार्थी हिस्सा
पंपाची क्षमता (अश्‍वशक्ती)--- किंमत (जीएसटी सह)--- लाभार्थी हिस्सा (सर्वसाधारण)---अनुसूचित जाती-जमाती
३ एचपी --- १ लाख ९३ हजार ८०३ --- १९ हजार ३८० --- ९ हजार ९६०
५ एचपी --- २ लाख ६९ हजार ७४६ --- २६ हजार ९७५ --- १३ हजार ४८८
७.५ एचपी ---३ लाख ७४ हजार ४०२--- ३७ हजार ४४० --- १८ हजार ७२०

जिल्हानिहाय अर्ज संख्या
कोल्हापूर--- १५८
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड --- प्रत्येकी १
वर्धा ---२
सांगली ---१ हजार ८२०
पालघर --- ८
पुणे ---२ हजार ६०२
सातारा---१ हजार ३६९
सोलापूर---१ हजार ४५०
नागपूर---३०
चंद्रपूर---२०
गडचिरोली--- ५४
भंडारा---४२०
गोंदिया---९४
अमरावती--- ६१
अकोला --- २७२
बुलडाणा --- ७३५
यवतमाळ --- १ हजार १४०
वाशीम ---७७३
नाशिक --- १ हजार ७६९
नगर --- १ हजार ४१९
धुळे --- १ हजार २३३
जळगाव --- ८९६
नंदुरबार --- १ हजार ३६
छत्रपती संभाजी नगर --- ७७९
जालना --- ९१९
परभणी --- ७३१
हिंगोली --- ९०७
लातूर --- ८२६
नांदेड --- ९५२
बीड --- ६९६
धाराशिव ---५००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com