Onion Rate : टोमॅटोनंतर आता कांद्याचे दर वाढण्याची शक्यता, पावसामुळे उत्पादनावर परिणाम

Onion Price Hike: यंदा डिसेंबरपर्यंत कांद्याचा पुरवठा कमी होण्याची शक्यता असल्याचे काही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
Onion Rate
Onion Rateagrowon

Onion Price Update : देशात टोमॅटोच्या दराने उच्चांक गाठला आहे अशातच आता आणखी काही भाजीपाला लोकांच्या खिशाला कात्री पाडण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार देशातील बहुतांश शहरांमध्ये कांद्याच्या किंमत वाढण्याची शक्यता आहे. पावसामुळे कांद्याच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून, त्यामुळे यंदा डिसेंबरपर्यंत कांद्याचा पुरवठा कमी होण्याची शक्यता असल्याचे काही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

गेल्या महिन्यात महाराष्ट्रातील पाच विभागांमध्ये कांद्याच्या किरकोळ किमतीत लक्षणीय वाढ झाल्याचे सरकारी आकडेवारीवरून समोर आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्या कांद्याच्या किंमती कमी असल्या तरी सरकारी आकडेवारीनुसार २०२० मध्ये भारतातील कांद्याची सरासरी किरकोळ किंमत ३५.८८ रुपये होती. ती २०२१ मध्ये सरासरी किरकोळ किंमत ३२.५२ रुपये झाली.

याचबरोबर २०२२ मध्ये ती २८ रुपये प्रति किलो राहिली. दरम्यान आता २०२३ मध्ये कांद्याचे भाव स्थिर राहिले आहेत. मात्र, येत्या काही महिन्यांत त्याची किंमत वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

सरकारने सुमारे दोन महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांकडून सुमारे ०.१४ दशलक्ष टन कांद्याचा साठा खरेदी केला आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार २०२३-२४ हंगामासाठी ३ लाख टन कांदे बफर स्टॉकमध्ये ठेवणार आहे.

तर मागच्या हंगामात २०२२-२३ मध्ये २.५१ लाख टन कांदा बफर स्टॉकमध्ये ठेवण्यात आला होता. दुसरीकडे, भारत सरकारने या महिन्याच्या सुरुवातीला एक अहवाल सादर केला होता. २०२१-२२ मध्ये कांद्याचे उत्पादन ३१.६९ दशलक्ष टनांवरून ३१.०१ दशलक्ष टनांपर्यंत घसरण्याचा अंदाज आहे.

Onion Rate
Onion Variety : कांद्याच्या 'या' जाती तुम्हाला बनवतील लखपती

बफर स्टॉकमध्ये कांदा का ठेवतात

कोणत्याही मालाच्या किमती स्थिर करण्यासाठी बफर स्टॉक ठेवला जातो. जेव्हा पुरवठा कमी असतो आणि किंमती वाढत असतात तेव्हा या स्टॉकचा उपयोग केला जातो.

टोमॅटोच्या दरात 80 रुपयांनी वाढ

देशभरात प्रथम अती तापमान अन् अचानक संततधार पाऊस यामुळे टोमॅटोच्या दरावर परिणाम झाला आहे. पाऊस आणि अति उष्णतेमुळे पीक निकामी झाल्यामुळे भारतात पुरवठ्याची टंचाई निर्माण झाली. अशा स्थितीत टोमॅटोचे भाव १५० रूपयांवर गेले. हवामानामुळे टोमॅटोशिवाय इतर भाज्यांचे दर घाऊक आणि किरकोळ बाजारात वाढले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com