Onion Market
Onion MarketAgrowon

Onion Market Rate : बांगलादेशने निर्बंध हटवताच कांदा दरात २५० रुपयांची वाढ

Onion Market Update : खरीप आणि लेट खरीप कांद्यानंतर उन्हाळ कांद्याच्या हंगामाच्या सुरुवातीपासून दरात अपेक्षित सुधारणा नसल्याने शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे.

Nashik News : खरीप आणि लेट खरीप कांद्यानंतर उन्हाळ कांद्याच्या हंगामाच्या सुरुवातीपासून दरात अपेक्षित सुधारणा नसल्याने शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. त्यातच वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीने जिल्ह्यातील कांदा उत्पादक पट्ट्यात मोठे नुकसान आहे. अशा परिस्थितीत मोठी कोंडी झाली होती.

हजार रुपयांच्या आत दर मिळत असल्याने जून महिन्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना दरवाढ होण्याची अपेक्षा होती. आता स्थिर झालेली आवक व बांगलादेशने आयातीवरील निर्बंध हटवल्याने कांदा दारात सुधारणा दिसून आली आहे. प्रतिक्विंटल मागे २०० ते २८० रुपयांपर्यंत सुधारणा झाल्याचे चित्र आहे. मात्र बाजारनिहाय आवक व प्रतवारीनुसार दर वेगवेगळे आहे.

जिल्ह्यात उन्हाळ कांद्याच्या बाजारात शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या खाली कांद्याची विक्री करावी लागली. अशातच सोमवारी (ता. ५) जिल्ह्यात पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वाधिक आवक होऊनही उन्हाळ कांद्याच्या दरात क्विंटलमागे ३०० रुपयांची वाढ दिसून आली.

Onion Market
Onion Shortage : हंगामाच्या शेवटी कांद्याची टंचाई भासण्याची शक्यता

जून महिन्याच्या सुरुवातीला हे दर ७५० ते ८५० रुपयांदरम्यान निघाले होते. जून महिन्यात पहिल्या सप्ताहात होणारी आवक २७ हजार क्विंटल होती. मात्र शनिवारी (ता. ३) आवकेत घसरण होऊन १७ हजार क्विंटलवर आली होती.

मात्र सोमवारी (ता. ५) पुन्हा आवकेत वाढ होऊन ३४,३७५ क्विंटल आवक झाली आहे. यापूर्वी जूनच्या सुरुवातीला प्रतिक्विंटल ७०१ रुपये सरासरी दर मिळाला होता. तर आता सरासरी दर १,१०० रुपयांवर आले आहेत. तर उच्चांकी २,२०० रुपये दर येथेच मिळाला आहे.

Onion Market
Onion Sowing Technology : राहुरीच्या दोन संशोधकांनी केलं कांदा लागवड यंत्र विकसित; थेट आफ्रिकेवरून आली मागणी

मागील महिन्यात वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीमुळे अनेक भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे कांदा सडण्याचे भीतीपोटी शेतकऱ्यांनी हा माल बाजारात विकण्याची घाई केली. परिणामी दरावर परिणाम होता.

शिवाय मागणीच्या तुलनेत देशांतर्गत पुरवठा व निर्यात कमी झाल्याने दरात नरमाई होती. मात्र आता स्थिर आवक व वाढत असलेल्या मागणीमुळे दर वाढत आहेत. तर शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवल्यानंतर टप्प्याटप्प्यात चांगल्या प्रतवारीचा कांदा बाजारात येऊ लागल्याने दरात सुधारणा झाल्याचे बाजार समितीचे सूत्रांनी सांगितले.

जिल्ह्यातील आवक (क्विंटलमध्ये) व दर (रुपयांत)

बाजार समिती...आवक..किमान...कमाल....सरासरी

पिंपळगाव बसवंत...३४,३७५...२००...२,२००...१,१००

लासलगाव...१६,०००...६००...१,५००...९००

सटाणा...१५,२५०...२००...१,३५०...८५०

कळवण...२०,२००...१५०...१६००...१०५०

येवला...१०,०००...३००...१,०७१...८००

सिन्नर...२,७०४...१००...१,०८३...७००

चांदवड...११,०००...२१२...१,२८०...७८०

देवळा...१०,५००...१००...१,२३०...९००

(संदर्भ: महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

एप्रिल-मे महिन्यात अनेक बाजार आवारात स्थानिक कांदा उपलब्ध होता. त्यामुळे मागणी कमी असल्याने पुरवठा होत नव्हता. त्यातच पावसामुळे कांदा खराब झाल्याने दरावर परिणाम होता. मागणी कमी असल्याने निर्यातीवर परिणाम दिसून आला. मात्र बांगलादेशसारख्या प्रमुख आयातदार देशाने आयातीवर निर्बंध काढल्याने दरात सुधारणा झाली आहे.
- खंडू काका देवरे,अध्यक्ष नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशन
गेल्या हंगामापासून कांद्याच्या दरात अपेक्षित सुधारणा नाही. चालूवर्षी पावसामुळे काढणीदरम्यान नुकसान अधिक आहे. तर काढणीपश्चात साठवलेला कांदा चाळीत खराब होत आहे. सध्या कांद्याच्या दरात सुधारणा झाली असली तरी उत्पादन खर्चाच्या खाली दर आहेत. नाफेड कांदा खरेदी सुरू होऊनही अपेक्षित दिलासा नाही.
- मधुकर मोरे, कांदा उत्पादक, मोरेनगर, ता. सटाणा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com