
Onion Price : केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावण्यात आला यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी यावर संताप व्यक्त केला. दरम्यान मागच्या ४ दिवसांपासून शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले.
दरम्यान शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने कांदा लिलाव अद्यापही बंद होते. परंतु आज नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याचे लिलाव पोलीस बंदोबस्तात पार पडले.
यावेळी कांद्याला सरासरी २१५० रुपये इतका बाजारभाव मिळाला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही नाफेड शुक्रवारी (दि.२५) कांदा खरेदीला न उतरल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता. निर्यात शुल्कवाढीविरोधात तीन दिवस लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा लिलाव बंद होता.
दरम्यान कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नाफेड मार्फत दोन लाख मॅट्रिक टन कांदा २४१० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदीची घोषणा केली. यानंतर काल (ता.२४) कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू झाल्यानंतर नाफेड कांदा खरेदी झालाच नाही.
यामुळे दिवसभर कांद्याचे लिलाव बंद ठेवत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला होता. दरम्यान याची थेट दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली यानंतर पोलीस बंदोबस्तात लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलाव पार पडले.
सकाळच्या सत्रात २०० वाहनांतून आलेल्या कांद्याला जास्तीत जास्त २ हजार ४०० रुपये तर सरासरी २ हजार १५० रुपये तर कमीत कमी ७०० रुपये इतका बाजारभाव प्रतिक्विंटलला मिळाला. मात्र चाळीमध्ये साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणात सडत असल्याने आज मिळणारे बाजारभाव न परवडणारे असल्याने नाफेडने ३ ते ४ हजार रुपये दराने कांदा खरेदी करावा, अशी जोरदार मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.