E-Peek Pahani : ई-पीक पाहणीत दीड कोटी शेतकरी सहभागाची शक्यता

Kharif Crop Registration : राज्यात यंदा पावसाअभावी काही भागात पेरण्या रखडल्या आहेत. मात्र शेतकऱ्यांनीकडून ई-पीकपाहणी वेगात सुरू आहे.
E-Peek Pahani
E-Peek PahaniAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यात यंदा पावसाअभावी काही भागात पेरण्या रखडल्या आहेत. मात्र शेतकऱ्यांनीकडून ई-पीकपाहणी वेगात सुरू आहे. ई-पीकपाहणीत यंदा दीड कोटी शेतकरी सहभागी होण्याची शक्यता आहे.

पीककर्ज मिळण्यासाठी तसेच पीकविमा, किमान आधारभूत धान्य खरेदी तसेच नैसर्गिक आपत्तीमधील मदत वाटपाकरिता ई-पीकपाहणीच्या नोंदी वापरण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.

त्यामुळे यंदा जास्तीत जास्त शेतकरी ई-पीकपाहणीत सहभागी होण्याची शक्यता आहे. तलाठ्याकडे न जाता आपल्या भ्रमणध्वनीच्या मदतीने शेतात जावून ई-पीकपाहणी करण्याची व नोंदणी करण्याची सुविधा शासनाने दिलेली आहे. या प्रकल्पाला १५ ऑगस्ट २०२१ रोजी सुरुवात झाली आहे. आता देशातील इतर राज्यांमध्येही ई-पीकपाहणी प्रकल्प सुरू केले जात आहेत.

E-Peek Pahani
E-Peek Pahani : उत्पादकतेचा खोडा त्यात ई-पीकपाहणीची अडचण

नैसर्गिक आपत्तीमधील मदत मिळण्यासाठी ई-पीकपाहणीचा तपशील पाहिला जातो. यंदा पावसाअभावी पीक वाया गेल्यास किंवा पुढे जास्त पाऊस झाल्याने पिकाचे नुकसान झाल्यास भरपाई मिळण्यासाठी ई-पीकपाहणीच्या नोंदी उपयुक्त ठरणार आहेत.

त्यामुळे ई-पीकपाहणीसाठी शेतकऱ्यांची गावशिवारात लगबग सुरू आहे. आतापर्यंत १ लाख ७१ हजार शेतकऱ्यांनी सव्वादोन लाख हेक्टरवरील पिकांची ई-पीकपाहणी करीत नोंदणी केली आहे.

E-Peek Pahani
E Peek Pahani : खरीप ई-पीकपाहणीची नोंदणी आजपासून सुरु

खरीप २०२२ च्या हंगामात एक कोटी ५३ लाख हेक्टर क्षेत्राची ई-पीकपाहणी एक कोटी १४ लाख शेतकऱ्यांनी केली आहे. ‘‘ई-पीकपाहणीसाठी भ्रमणध्वनी उपयोजन (अॅप्लिकेशन) वापराची नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची एकूण संख्या आता एक कोटी ८८ लाखांच्या पुढे गेली आहे, गेल्या हंगामात ९१ टक्के ई-पीकपाहणी झाली होती. चालू खरिपात मात्र १०० टक्के ई-पीकपाहणी होईल असा आमचा अंदाज आहे,’’ अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.

शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ई-पीकपाहणी अत्यावश्यक ठरते. या सहभागी न झाल्यास विविध योजनांच्या लाभापासून वंचित राहू शकते. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी वेळेत पीकपाहणी करावी.
- उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे, राज्य समन्वयक, ई-पीकपाहणी प्रकल्प

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com