PM Kisan : पीएम किसानच्या हफ्त्याची तारीख ठरली, ९ कोटी शेतकऱ्यांना होणार फायदा

PM Kisan fund : २८ जुलै रोजी पीएम किसानचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
PM Kisan fund
PM Kisan fundagrowon
Published on
Updated on

Pradhan Mantri Kisan Samman Nidhi : केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा १३ वा हप्ता २७ फेब्रुवारी रोजी प्रदान करण्यात आला होता. दरम्यान ४ महिन्यांना जमा होणारा १४ वा हफ्ता अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला नाही. परंतु केंद्र सरकारकडून याबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे.

१४ व्या हफ्त्यासाठी शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा संपणार आहे. २८ जुलै २०२३ ला देशातील सुमारे ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर २ हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

२८ जुलैला खात्यात २ हजार रुपये येणार?

२८ जुलै रोजी राजस्थानमधील नागौर जिल्ह्यात PUM किसान सन्मान निधीच्या कार्यक्रमात PM मोदी DBT हस्तांतरणाद्वारे एकूण 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हजार कोटी रुपये हस्तांतरित करणार असल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान या कार्यक्रमावेळी ३ लाख शेतकऱ्यांची उपस्थिती असणार आहे.

१४ हफ्ता मिळवण्यासाठी या बाबी महत्वाच्या

तुम्हाला पीएम किसानचा १४ वा हप्ता मिळवायचा असेल, तर तुमचे ई-केवायसी पूर्ण असले पाहिजे. तुम्‍ही अद्याप केवायसी केले नसेल, तर ते लवकर करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना आपल्या जवळच्या CSC केंद्राला भेट देऊन किंवा PM किसान पोर्टल pmkisan.gov.in वर जाऊन ई-केवायसी करावी लागणार आहे.

याशिवाय पीएम किसान योजनेसाठी जमिनीच्या नोंदी पडताळण्याची प्रक्रियाही सुरू आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन जमिनीची पडताळणी करून घ्यावी. दरम्यान तुम्ही पडताळणी केली नसेल तर पीएम किसान योजनेच्या रकमेपासून वंचित राहू शकता.

PM Kisan fund
PM Kisan : वीस दिवसांत १० हजार कुटुंबांचे ई-केवायसी

अर्ज करताना काळजी घ्या

पीएम किसानचा तुम्ही भरलेल्या अर्जात कोणतीही चूक होणार नाही याकडे लक्ष द्यावे लागेल. उदाहरणार्थ, नावाची चूक, चुकीचा आधार क्रमांक किंवा चुकीचा पत्ता. याशिवाय, खाते क्रमांक चुकीचा असला तरीही तुम्ही पुढील हप्त्यापासून वंचित राहू शकता.

दरम्यान तुम्ही भरलेली माहिती चुकीची असेल तर यामध्ये सुधारणा करता येते. यासाठी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्जावर लिहलेल्या चुकीची माहिती दुरुस्त करण्याची तुम्हाला संधी आहे. यानंतर तुमचे पीएम किसानचे हफ्ते मिळण्यास कसलीही अडचण राहणार नाही. याचबरोबर पीएम किसानच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही योजनेचे लाभार्थी आहात का याचीही माहिती मिळते.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर २ हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम अदा करण्यात येते.

पीएम किसान योजनेशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्येसाठी शेतकरी pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकतात. तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन क्रमांक- 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 वर संपर्क साधू शकता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com