Prafull Patel : गोंदिया जिल्ह्यातील पदाधिकारी प्रफुल्ल पटेल यांच्या पाठीशी

NCP Crisis : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सुरु असलेली धुसफूस आणि पडलेल्या दोन गटांमागे खासदार प्रफुल्ल पटेल हे मास्टरमाइंड मानले जातात.
Prafull Patel
Prafull PatelAgrowon
Published on
Updated on

Gondia News : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सुरु असलेली धुसफूस आणि पडलेल्या दोन गटांमागे खासदार प्रफुल्ल पटेल हे मास्टरमाइंड मानले जातात. असे असले तरी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांऐवजी प्रफुल्ल पटेल यांच्याच पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे.

शरद पवार यांचे अत्यंत विश्‍वासू म्हणून प्रफुल्ल पटेल यांना मान्यता होती. परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये विभाजन करण्यात प्रफुल्लभाईंचाच हात असल्याचे सांगितले जाते. भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी दिल्लीत पटेल यांनीच चर्चा करून हे सारे घडवून आणले, असेही सूत्र सांगतात.

Prafull Patel
Sharad Pawar: ना टायर्ड हूं, ना रिटायर्ड... ; शरद पवारांचा पलटवार

सद्या राष्ट्रवादी कॉंग्रेस कोणाची या मुद्द्यावरून राज्यात घमासान सुरू आहे. अशातच गोंदिया जिल्ह्यातील पदाधिकारी कोणाच्या बाजूने हा मुद्दा देखील चर्चेत होता. बुधवारी (ता.४) मुंबईत दोन्ही गटांनी शक्‍तीप्रदर्शनाच्या उद्देशाने एकाच दिवशी बैठक बोलावली. गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना देखील या बैठकीचे निमंत्रण होते.

Prafull Patel
Sharad Pawar Vs Ajit Pawar : वय आणि व्यक्तिगत हल्ले केले तर याद राखा ; शरद पवारांचा इशारा

यातील कोणत्या बैठकीला उपस्थित राहावे यावरून त्यांच्यात गोंधळ असताना अखेरीस खासदार पटेल यांच्या नेतृत्वाला मानत सुनील तटकरे यांनी बोलावल्या बैठकीला हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यातील पदाधिकारी पटेल यांच्या पाठीशी असल्याचे सिद्ध झाले.

पदाधिकारी पाठीशी असल्याचे सिद्ध करण्याकरिता दीड हजारावर कार्यकर्ता, पदाधिकाऱ्यांचे हमीपत्र घेण्याची तयारी देखील राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून केली जात आहे.

...तर भाजपला मतदारसंघ सोडावा लागेल

या साऱ्या घडामोडी घडत असताना लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागणार असल्याचे जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुराम यांनी सांगितले. दुसरीकडे अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा देत लोकसभा लढविल्यास हा मतदार संघ पटेल यांच्याकरिता सोडावा लागणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com