Kharif Sowing : पेरण्या लांबल्याने कृषी निविष्ठांचा साठा पडून

Agriculture Inputs : पावसाअभावी खरिपातील पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांप्रमाणेच कृषी निविष्ठा विक्रेत्यांचीही चिंता वाढली आहे.
Kharif Sowing
Kharif Sowing Agrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : पावसाअभावी खरिपातील पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांप्रमाणेच कृषी निविष्ठा विक्रेत्यांचीही चिंता वाढली आहे. त्यांनी बँकेकडून कर्जे घेऊन बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके खरेदी करून ठेवली आहेत. हा साठा पडून आहे.

त्यामुळे विक्रेते आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे शासनाने दिलासा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र फर्टिलायझर्स पेस्टिसाइड्स सीड्स डीलर्स असोसिएशनने (माफदा) कृषिमंत्र्यांकडे केली आहे.

‘‘राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या अडचणी व मागण्या कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासमोर मांडल्या आहेत,’’ अशी माहिती ‘माफदा’चे महासचिव विपिन कासलीवाल यांनी दिली आहे.

Kharif Sowing
Kharif Sowing : कोकणातील बळीराजाचे लक्ष आभाळाकडे, खरिपांची पेरणी न झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त

कासलीवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ७० हजार पेक्षा जास्त कृषी निविष्ठा विक्रेते आहेत. त्यांच्या अडचणी सोडविण्याचे काम गत ४० वर्षांपासून माफदा करीत आहे. नांदेड दौऱ्यादरम्यान कृषिमंत्र्यांची भेट घेऊन कृषी विक्रेत्यांना येत असलेल्या अडचणींबाबत चर्चा करण्यात आली.

Kharif Sowing
Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात खरिपाचा अवघा ४ टक्के पेरा

सत्तार यांना निवेदन देताना कासलीवाल यांच्यासह ‘माफदा’चे उपाध्यक्ष मधुकर मामडे, नांदेडचे कृषी साहित्य विक्रेता संघटनेचे जिल्हाध्यक्ष सदाशिवराव पुंड, सचिन तोष्णीवाल, धनंजय पाटील, संजय सारडा श्रीकांत वैद्य, आनंद मुथा, केदार सारडा तसेच जिल्हाधिकारी अभिजित राऊत, आमदार बालाजी कल्याणकर, लातूरचे विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर, कृषी अधीक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे आदी उपस्थित होते.

...या आहेत मागण्या

- बियाणे सॅम्पल फेल होण्याच्या प्रकरणात विक्रेत्यास आरोपी न ठरविता साक्षीदार समजावे

- अनेक वर्षे प्रलंबित, अनिर्णित केसेस दहा वर्षांनंतर रद्द कराव्यात

- बियाणे गुणवत्ता तपासणीसाठी घेतलेल्या सॅम्पलची रक्कम विक्रेत्यास मिळावी

- रासायनिक खते विक्रेत्यास विक्री केंद्रामध्ये पोहोच पद्धतीने मिळावीत

- युरिया व संयुक्त खतांसोबत इतर खतांची विक्री लिंकिंग पद्धतीने करण्यास बंदी करावी

- ऑनलाइन पद्धतीने बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके व इतर साहित्य विक्रीस बंदी करावी

- मुदतबाह्य कीटकनाशक औषधे संबंधित पुरवठादार कंपनीने परत जमा करून घ्यावीत

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com