Kharif Sowing : कोकणातील बळीराजाचे लक्ष आभाळाकडे, खरिपांची पेरणी न झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त

Cyclone Biperjoy : बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सून पुढे गेल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. दरम्यान मान्सून कोकणातही अद्याप न आल्याने कोकणातील भात, नाचणी, उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
Kharif Sowing
Kharif SowingAgrowon
Published on
Updated on

Pune News : बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सून पुढे गेल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. दरम्यान मान्सून कोकणातही अद्याप न आल्याने कोकणातील भात, नाचणी, उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

हवामान विभागाकडून मान्सून पुढच्या 72 तासांत दाखल होणार अशी माहिती देण्यात आली असली तरी कोकणात अद्यापही उन्हाच्या झळा असह्य होत आहेत. भात उत्पादक शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

Kharif Sowing
Biporjoy Cyclone : सौराष्ट्र, कच्छसह उत्तर गुजरातेत मुसळधार

निम्मा जून गेला तरी पेरण्या न झाल्याने शेतकरी पेरण्यांकडे पाठ फिरवण्याची शक्यता आहे. यामुळे कोकणातील शेतकरी चांगलाच अडचणीत सापडू शकतो. सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात काही अंशी पाऊस होत असला तरी तो पेरण्या करण्याइतपत जोरदार नसल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. मात्र तळ कोकणातील शेतकरी खरिपाच्या तयारीला लागल्याचे चित्र आहे.

रोहिणीचा पेरा आणि मृग नक्षत्रासह अन्य नक्षत्राच्या पावसाच्या जोरावर शेतकऱ्यांचे गणित अवलंबून असते. परंतु मागच्या काळात दोन्ही नक्षत्रात एक थेंबही पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे त्यांना दुबार पेरण्या करण्याचं संकट ओढावलं आहे.

दरम्यान हवामान खात्याने देखील जोपर्यंत पुरेसा पाऊस पडत नाही तोपर्यंत पेरणी न करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे. त्यामुळे आता जर मान्सूने योग्य वेळेत हजेरी लावली नाही तर पुन्हा एकदा शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागणार आहे.

परंतु अद्याप पाऊस पडला नसल्यामुळे पेरणी वेळेवर होणार की नाही असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा आहे.

पुढचे चार दिवस मुंबईसह कोकणात जोरदार पाऊस

हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढचे चार दिवस मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, ठाणे आणि नाशिक या शहरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. १९ ते २२ या दरम्यान कोकणातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com