Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’ चा आता मांडवे, नंदूरमध्ये प्रादुर्भाव

सोलापूरजिल्ह्यात शिंगोर्णी (ता. माळशिरस) येथील जनावरांना पहिल्यांदा लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झाला. तेथील काही जनावरे उपचारानंतर बरीही झाली.
Lumpy Skin Disease
Lumpy Skin DiseaseAgrowon

सोलापूर ः(Lumpy Update Solapur) जिल्ह्यात शिंगोर्णी (ता. माळशिरस) येथील जनावरांना पहिल्यांदा लम्पी स्कीनचा (Lumpy Skin) प्रादुर्भाव झाला. तेथील काही जनावरे उपचारानंतर बरीही झाली. पण त्यानंतर आता मांडवे (ता. माळशिरस) आणि नंदूर (ता. उत्तर सोलापूर) या दोन नव्या ठिकाणी ‘लम्पी स्कीन’चा शिरकाव झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्याशिवाय सांगोला तालुक्यातील महूद आणि मिसाळवाडीतील जनावरांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. पण त्यांचा अहवाल अद्याप आलेला नाही. मांडवे येथे चार जनावरांना, नंदूरमध्ये एका कालवडीला या आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे.

Lumpy Skin Disease
Sugar Conference : शरद पवार यांच्या उपस्थितीत उद्यापासून साखर परिषद

या गावांत लसीकरण करण्यात येत आहे. शिवाय उत्तर सोलापूर तालुक्यातील नंदूर गावातही लसीकरण सुरू आहे. मांडव्यात गुरुवारी (ता.१५) १२०० आणि नंदूर परिसरात १२५५ जनावरांचे लसीकरण करण्यात आले. लसीकरणाला वेग जिल्ह्यासाठी पुणे येथून २१ हजार लस मिळाल्या. तर माळशिरस येथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी ५५०० लस खरेदी केल्या आहेत. एकूण २६ हजार ५०० लसी उपलब्ध आहेत. प्रादुर्भाव झालेल्या या ठिकाणासह जिल्ह्यात अन्य ठिकाणीही लसीकरणाला प्राधान्य देण्यात येत आहे.

बाधित क्षेत्र, मोठ्या गोशाळा, मोठ्या प्रमाणात जनावरे असणारे डेअरी फार्म, गोठ्यांमध्ये, जास्त जनावरे असलेल्या ठिकाणी प्रामुख्याने लसीकरण वाढवण्यात येत असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले. पशुपालकांनी कोणत्याही अफवेवर विश्‍वास ठेवू नये. गाय, म्हैस आणि वासरू, रेडकू यांनाच लम्पी स्कीन हा आजार होतो. इतर प्राणी, पक्ष्यांना हा आजार होत नाही. त्यामुळे पशुपालकांनी घाबरून जाऊ नये. जनावरांच्या अंगावर मोठे पुरळ उठल्यास त्या जनावराला इतर जनावरांपासून दूर विलगीकरणात ठेवा. अशा जनावरांवर शासकीय दवाखान्यात उपचार करावेत.

- डॉ. एन. ए. सोनवणे, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग, सोलापूर

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com