Orchard planting
Orchard plantingAgrowon

Fertilizers Subsidy : शेतकऱ्यांसाठी सरकारचा निर्णय ! आता शेतकऱ्यांना खतांवरही मिळणार १०० टक्के अनुदान

Orchard planting : राज्यातील शेतकऱ्यांसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून खड्डे खोदणे, ठिबक सिंचन यांसारख्या कामांना १०० टक्के अनुदान दिले जाते होते. त्याचबरोबर आता या योजनेतून रासायनिक व सेंद्रीय खतांसाठीदेखील १०० टक्के अनुदान दिले जाणार आहे.
Published on

Bhausaheb Phundkar scheme : राज्यातील शेतकऱ्यांसाठी शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध होण्यासाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना खड्डे खोदणे, ठिबक सिंचन खरेदीसाठी १०० टक्के अनुदान दिले जात होते. त्याचबरोबर आता फळबागांसाठी आवश्यक खतांसाठी १०० टक्के अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत सन 2023-24 पासून या योजनेअंतर्गत आंबा, डाळींब, काजू, पेरू, सीताफळ आवळा, चिंच, जांभूळ, कोकम, फणस, कागदी लिंबू, नारळ, चिकू, संत्रा, मोसंबी, अंजीर या १५ फळ पिकांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच फळबाग लागवड योजनेतून ठिबक ऐवजी सर्व प्रकारच्या आवश्यक खतांसाठी 100 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com