
पूर्णा, जि.परभणी ः यंदाच्या (२०२२-२३) गळीत हंगामात (Sugar crushing Season) नऊ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. ऊस उत्पादकांना एफआरपीनुसार (Sugarcane FRP) पहिली उचल प्रतिटन दोन हजार रुपये देण्यात येईल. दुसरा हप्ता पोळा सणाला प्रतिटन ३०० रुपये आणि उर्वरित रकमेचा तिसरा हप्ता दिवाळी पूर्वी दिला जाईल, अशी ग्वाही कानडखेड (ता. पूर्णा) येथील बळिराजा साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव जाधव (Shivajirao Jadhav) यांनी दिली.
रविवारी (ता. ३०) बळीराजा साखर कारखान्याचा नववा गळीत हंगाम प्रारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. संचालक दिनकरराव उर्फ आप्पासाहेब जाधव, अॅड. अब्दुल सईद, ताडकळस बाजार समितीचे सभापती अजित वरडपुरकर, राजेश धुत, तुकाराम सालपे, जगदीश जोगदंड, दौलत भोसले, गजानन हिवरे, संजय गव्हाणे यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी व वाहतुक ठेकेदार आदींची उपस्थिती होती.
जाधव म्हणाले, की यंदाचे ऊस गाळप उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी,ऊस तोडणी व वाहतुक ठेकेदार, अधिकारी, कर्मचारी व कामगार यांनी सहकार्य करावे. याप्रसंगी कारखान्याचे जनरल मॅनेजर भगवान मोरे, वर्क्स मॅनेजर तुकाराम सुरवसे, चिफ केमिस्ट किरण मगर, मुख्य शेतकी अधिकारी रमेश पौळ,
मदन देशमुख, प्रशासकीय अधिकारी श्रीकांत पुदाले, नितीन गणोरकर, मोतीराम पौळ, संजय पंतगे, ओमप्रकाश मनीयार, विनायक कऱ्हाळे, रामजी शिंदे, विनायक कदम, डी. सी. कुऱ्हे, आर. मोगरगे, रमेश कांबळे तसेच कारखान्यातील अधिकारी, कर्मचारी व कामगार उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.