Milk Union Election : नंदुरबारात आदिवासी दूध उत्पादक संघ बिनविरोध

गेल्या ४० वर्षांपासून लोकनेते माजी आमदार (स्व.) बटेसिंग रघुवंशी व बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी गटाची सत्ता आहे.
Solapur District Milk Union Election Front
Solapur District Milk Union Election Front

Nandurbar Milk Union Election News ः आदिवासी दूध उत्पादक (Milk Producer) पूरक उद्योग सहकारी संघाची निवडणूक यंदाही बिनविरोध पार पाडली.

गेल्या ४० वर्षांपासून लोकनेते माजी आमदार (स्व.) बटेसिंग रघुवंशी व बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी (Chandrakant Raghuvanshi) गटाची सत्ता आहे. अध्यक्षपदी डोंगरसिंग कोकणी यांची बिनविरोध निवड झाली.

सहायक निबंधक तथा अध्यासी अधिकारी नीरज चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी दूध उत्पादक कृषिपूरक उद्योग सहकारी संघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी मंगळवारी संघाच्या कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पडली.

Solapur District Milk Union Election Front
Sanen Goat : जास्त दूध उत्पादनासाठी सानेन शेळी?

आमदार कार्यालयात नवनियुक्त अध्यक्ष डोंगरसिंग कोकणी यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

नवनियुक्त संचालक मंडळ

अध्यक्ष- डोंगरसिंग कोकणी, उपाध्यक्ष- चंद्रकांत रघुवंशी, संचालक- सुरेश शिंत्रे, अनिता पाटील, यशवंत पाटील, सखाराम पाटील, वैशाली पाटील, हिरकणबाई पाटील, माधुरी मराठे, भारतसिंग राजपूत, उषा पाटील, योगिता पाटील, सेजल पाटील.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com