APMC Election : नामपूर बाजार समिती निवडणुकीचा बिगुल वाजला

Nampur APMC Election : अचानक निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्याने तालुक्यातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून आजी-माजी आमदारांच्या पॅनेलमध्ये रंगतदार निवडणुकीची शक्यता वर्तवली जात आहे.
Nampur APMC
Nampur APMCAgrowon
Published on
Updated on

Nashik News : नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे सहकार प्राधिकरणाच्या जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी नुकताच जाहीर केला असून ८ ऑक्टोबरला बाजार समितीची निवडणूक होणार आहे.

अचानक निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्याने तालुक्यातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून आजी-माजी आमदारांच्या पॅनेलमध्ये रंगतदार निवडणुकीची शक्यता वर्तवली जात आहे.

सटाणा बाजार समितीचे विभाजन झाल्यानंतर २०१८ मध्ये नामपूर बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक घेण्यात आली. यात मोसम खोऱ्यातील ९३ गावांमधील सुमारे पन्नास हजारांहून अधिक शेतकऱ्यांना पहिल्यांदा मतदानाचा अधिकार मिळाला होता.

परंतु यंदा पूर्वापार पद्धतीप्रमाणे सहकारी सोसायटीचे संचालक, ग्रामपंचायत सदस्य उमेदवारांना मतदान करतील. २० जूनला संचालक मंडळाची मुदत संपल्याने नाशिक येथील जिल्हा उपनिबंधक फैय्याज मुलाणी यांनी प्रशासकांची नेमणूक केली.

Nampur APMC
Solapur APMC Election : बाजार समित्यांची निवडणूक की संचालकांना मुदतवाढ?

पाच वर्षांत कोट्यवधींच्या खर्चातून मुख्य प्रशासकीय इमारत बांधणे, पावसाळ्यात लिलावाप्रसंगी शेतकऱ्यांचे होणारे हाल लक्षात घेता मुख्य आवारात पेव्हरब्लॉक बसविणे, शेतकऱ्यांसाठी स्वच्छतागृह, नळकस रस्त्यालगतच्या कांदा मार्केटमध्ये शेड आदी कामांत दिरंगाई झाल्याने संचालक मंडळाला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यामुळे विद्यमान संचालक मंडळाला कोणत्याही परिस्थितीत एक दिवसाचीही मुदतवाढ देऊ नये, यासाठी तालुक्यातील राजकीय गट सक्रिय झाला होता.

बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाच्या मुदतवाढीस मुंबई येथील उच्च न्यायालयाने नुकतीच स्थगिती दिली होती. नामपूरच्या संचालक मंडळास मिळालेल्या मुदतवाढीच्या विरोधात तांदुळवाडी (ता. बागलाण) येथील सामाजिक कार्यकर्ते आकाश भामरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

येथील संचालक मंडळाची पाच वर्षांची कारकीर्द २० जूनला संपुष्टात आल्यानंतर सहकार विभागाने तातडीने येथील मालेगाव येथील प्रथम श्रेणीचे सहकार अधिकारी स्वप्नील मोरे यांची प्रशासक म्हणून नेमणूक केली. परंतु त्यानंतरच्या काळात संचालक मंडळाने ४ ऑगस्टला समितीचे सत्तासूत्र ताब्यात घेतले.

Nampur APMC
Karmala APMC Election : करमाळा बाजार समितीसाठी आठ ऑक्टोबरला निवडणूक

याविरोधात आकाश भामरे यांनी न्यायालयात दाद मागून संचालकांच्या कारभाराला पूर्णविराम दिला. निवडणुकीच्या निर्णयाचे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी स्वागत केले. योगेश काकडे, बिजोरसे यांनी सर्वसाधारण सोसायटी गटातून पहिला उमेदवारी अर्ज दाखल केला. बुधवारअखेर (ता. ६) ३ अर्ज दाखल झाले आहेत.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

नामनिर्देशन पत्र दाखल ५ ते ११ सप्टेंबर

अर्जांची छाननी १२ सप्टेंबर

मेदवारांची यादी प्रसिध्द करणे १३ सप्टेंबर

माघार २७ सप्टेंबर

चिन्ह वाटप २९ सप्टेंबर

निवडणूक मतदान ८ ऑक्टोबर

मतमोजणी ९ ऑक्टोबर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com