

Nanded News : पीकविम्याचे (Crop Insurance) पैसे ऑनलाइन केंद्रचालकाने परस्पर उचलल्याने तब्बल दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून शेतकरी पैसे परत मिळण्यासाठी खेटे मारत आहे. परंतु ते न मिळाल्याने शेवटी शेतकऱ्याने सोमवारी (ता. १०) जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केला पोलिसांनी शेतकऱ्यास लगेच ताब्यात घेतले.
हदगाव तालुक्यातील कवाना येथील पुंडलिक लोभाजी बोलके यांनी चिंचगव्हाणच्या ऑनलाइन केंद्रचालकाकडे पीकविम्याचे आलेले पैसे आणण्यासाठी २०२० मध्ये गेले होते. या वेळी ऑनलाइन केंद्रचालकांनी तुमचा अंगठा होऊन जात नाही, त्यामुळे खात्यावर रक्कम काढता येत नसल्याचे सांगितले. त्यामुळे बोलके हे परत आले.
त्यानंतर तीन महिन्यांनी पुन्हा बलके पैसे उचलण्यासाठी गेले. त्या वेळी केंद्रचालकाने पैसे आलेच नाहीत, असे म्हणून परत पाठवले. यानंतर सहा महिन्यांनी एटीएम काढून खात्यातील रक्कम काढण्यासाठी गेले असता, खात्यातून २९ हजार दोनशे रुपये परस्पर काढून घेतल्याचे लक्षात आले.
या बाबत केंद्रचालकाला जाब विचारला असता तुमचे पैसे लवकर देतो, असे बोलून वेळ मारून नेली. परंतु गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून ते पैसे परत केले नाहीत. यामुळे केंद्रचालकाकडून माझे पैसे वसूल करून त्यांचा परवाना रद्द करण्यात यावा, अशी मागणी बोलके यांनी केली.
परंतु त्यावर कोणती कारवाई झाली नसल्याने बोलके यांनी सोमवारी (ता. १०) जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात येऊन विषारी कीटकनाशक प्राशन करण्याचा प्रयत्न केला. या वेळी लगेच बंदोबस्तातील पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला. या बाबत मनाठा पोलिस पुढील तपास करीत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.