Crop Insurance Company : जामिनासाठी पीकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांचा अर्ज

पीक नुकसान पंचनाम्यांतील घोळ; उद्या सुनावणीची शक्यता
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
अकोला : जिल्ह्यात पंचनाम्यांवरील (Survey) क्षेत्र, नुकसान टक्केवारीत खाडाखोड करणे, खोट्या स्वाक्षरी करणे, बाधित क्षेत्रापेक्षा व नमूद नुकसानीच्या टक्केवारीपेक्षा कमी रक्कम अदा करणे, अशा विविध आरोपांखाली जिल्ह्यात आयसीआयसीआय लोंबार्ड पीकविमा कंपनीच्या (Lombard Crop Insurance Company) अधिकाऱ्यांविरुद्ध गेल्या आठवड्यात गुन्हा दाखल झालेला आहे.

यातील आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्‍यायालयात अर्ज केला आहे. त्यावर शुक्रवारी (ता. ३१) सुनावणी होण्याची शक्यता आहे.

या प्रकरणात पीकविमा कंपनीसाठी सर्वेक्षणाचे काम करणाऱ्या सबएजन्ट एजन्सीविरुद्धही आता पोलिस तक्रार दाखल होण्याची शक्यता आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी खात्यातील अधिकाऱ्यांना स्पष्टपणे निर्देश दिल्याची माहिती मिळाली आहे.

Crop Insurance
Crop Insurance Company : बुलडाण्यात पीकविमा कंपनीची कार्यालये बंद

प्रभारी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरलीधर इंगळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून २१ मार्चला स्थानिक खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

मात्र, हे प्रकरण २५ लाखांपेक्षा अधिक रकमेचे असल्याने आता पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जात आहे. विमा कंपनीविरुद्ध तीन कोटी ९५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा ठपका तक्रारीत ठेवला आहे.

Crop Insurance
Crop Insurance : पीकविमा कंपनीविरोधात अकोल्यात गुन्हा दाखल

खरीप हंगाम २०२२-२३ साठी पंतप्रधान पीक विमा योजनेची अंमलबजावणीची जबाबदारी आयसीआयसीआय लोंबार्ड कंपनीकडे होती.

जिल्ह्यात खरीप हंगामात पिकांचे स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे व काढणीपश्‍चात नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी कंपनीला पूर्वसूचना दिल्या होत्या. मात्र याची दखल घेतली गेली नाही.

काढणीपश्‍चात नुकसान भरपाईसाठी एकाही शेतकऱ्याचे सर्वेक्षण झाले नसल्याची गंभीर बाबींसमोर आल्यानंतर या प्रकरणाचा गुंता सुटत गेला. कृषी विभागाने याची सखोल चौकशी केल्यानंतर असंख्य बाबींना वाचा फुटली.

या प्रकरणात आयसीआयसीआय लोंबार्ड विमा कंपनीचे प्रतिनिधी प्रभास अरबाईन, कमलेश पाटील यांच्यासह तालुकास्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल आहे.

सर्वेक्षण करणारी एजन्सीही अडचणीत
या प्रकरणात पीक नुकसानीचे सर्वेक्षण करण्यासाठी नेमलेल्या एजन्सीच्या कर्मचाऱ्यांचाही या घोळात सहभाग असल्याची शंका जिल्हा प्रशासनाला आहे.

मुख्य जबाबदारी त्यांनीच पार पाडली. यामुळे आता विमा कंपनीची ही सबएजंट कंपनीसुद्धा कारवाईच्या कक्षेत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या बैठकीत कृषी अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे निर्देश दिले. लवकरच या कंपनीवर पोलिस तक्रार दाखल होऊ शकते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com