Muskmelon Cultivation : खानदेशात खरबूज लागवडीत वाढ

खरबूज शेती जळगाव, धुळे व नंदुरबारात समान क्षेत्रात आहे. यंदा सुमारे ५०० ते ५२५ हेक्टरवर खरबूज आहे. या महिन्यात सुरवातीला व सध्याही खरबूज लागवड सुरू आहे.
Muskmelon
MuskmelonAgrowon

जळगाव ः एकेकाळी नदीकाठी येणारे पीक अशी ओळख असलेल्या खरबुजाची खानदेशात व्यावसायिक शेती (Commercial Farming Of Muskmelon) वाढत आहे. मागील काही वर्षात क्षेत्र ५०० हेक्टरवर पोहचले आहे.

कलिंगडाची लागवडही (Watermelon Cultivation) वर्षागणिक वाढली आहे. ही लागवड यंदा अडीच हजार हेक्टरवर आहे. खरबुजाची काही वर्षांपूर्वी गिरणा, तापी, सुसरी, गोमाई, पांझरा, अनेर, वाघूर आदी नद्यांच्या काठावर किंवा नदीमधील गाळ व वाळू मिश्रित क्षेत्रात लागवड केली जात होती.

नदीमधील डांगर मळयांची अर्थात खरबुजाची शेती आता सर्वत्र होत आहे. विविध वाण, गादीवाफा, मल्चींग पेपर, ठिबक आदी तंत्राच्या मदतीने काळ्या कसदार, मध्यम, हलक्या जमिनीतही खरबुजाची शेती बहरू लागली आहे.

खरबूज शेती जळगाव, धुळे व नंदुरबारात समान क्षेत्रात आहे. यंदा सुमारे ५०० ते ५२५ हेक्टरवर खरबूज आहे. या महिन्यात सुरवातीला व सध्याही खरबूज लागवड सुरू आहे.

काही शेतकरी सप्टेंबरमध्ये खरबूज लागवड करतात. तर काही शेतकरी जानेवारी व फेब्रुवारीत लागवड करतात. दोन ते सव्वादोन महिन्यांचे हे पीक आहे. अतिशय संवेदनशील पीक असल्याने त्याचे काटेकोर व्यवस्थापन केले जाते.

दोन महिन्यात पाच ते सात फवारण्या, विद्राव्य खतांचा वापर, सुरवातीचे बेसल डोस, अशी कार्यवाही सातत्याने करावी लागते.

सव्वादोन महिने सतत शेतकरी या पिकात व्यस्त असतात. गुजरात, मध्य प्रदेश, मुंबई, ठाणे आदी भागात खरबुजाची पाठवणूक केली जाते.

एकरी सात ते नऊ टन उत्पादन अनेक शेतकरी साध्य करतात. मागील हंगामात दर काही दिवस टिकून होते.

Muskmelon
Watermelon Cultivation : कलिंगड लागवड करताना ही काळजी घ्या

सरासरी १२ रुपये प्रतिकिलोचा दर जागेवर शेतकऱ्यांना मिळाला होता. यंदाही चांगले दर मिळतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

अनेक भागात सध्या पीक १० ते १५ दिवसांचे आहे. काही शेतकऱ्यांनी मार्चअखेरीस पीक काढणीवर येईल, या दृष्टीने लागवड केली आहे. कारण उष्णतेत खरबुजास चांगली मागणी असते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com