Sugar Factory Election : गडहिंग्लज तालुका सहकारी कारखान्यावर मुश्रीफ गटाची बाजी

अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या (गोडसाखर) निवडणुकीत आमदार हसन मुश्रीफ, डॉ. प्रकाश शहापूरकर, संध्यादेवी कुपेकर, प्रकाश चव्हाण, अप्पी पाटील, राजेंद्र गड्ड्यान्नावर व संग्राम कुपेकर यांच्या शाहू समविचारी आघाडीने बाजी मारली.
Sugar  Factory Elation
Sugar Factory Elation Agrowon

गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या (Sugar Factory) (गोडसाखर) निवडणुकीत (Election) आमदार हसन मुश्रीफ, डॉ. प्रकाश शहापूरकर, संध्यादेवी कुपेकर, प्रकाश चव्हाण, अप्पी पाटील, राजेंद्र गड्ड्यान्नावर व संग्राम कुपेकर यांच्या शाहू समविचारी आघाडीने बाजी मारली.

Sugar  Factory Elation
Sugar Factory : ‘श्रीलक्ष्मी नृसिंह शुगर्स’च्या गाळप हंगामास प्रारंभ

आघाडीने तीन ते साडेतीन हजारांच्या मताधिक्याने सर्व १९ जागांवर बाजी मारत आमदार राजेश पाटील, श्रीपतराव शिंदे, संग्रामसिंह नलवडे व शिवाजी खोत यांच्या काळभैरव विकास आघाडीचा धुव्वाँ उडविला. मुश्रीफ-शहापूरकरांनी एकहाती सत्तेसाठी केलेल्या आवाहनानुसार सभासदांनी एकतर्फी कौल दिला.

‘गोडसाखर’च्या १९ जागांसाठी शाहू समविचारी व काळभैरव आघाडीत दुरंगी लढत होती. पाच अपक्षही रिंगणात होते. बहुतांश मतदान केंद्रामध्ये काळभैरव आघाडी मागे राहिली. यामुळे पहिल्या फेरीपासून शाहू आघाडीच्या मताधिक्याचा आलेख वाढत गेला.

Sugar  Factory Elation
Onion Cultivation : खरीप, लेट खरीप कांदा लागवडीत घट

काळभैरव आघाडीचे स्टार प्रचारक ठरलेले अमर चव्हाण यांच्या विजयाची खात्री बाळगणाऱ्‍यांना चव्हाणांच्या अनपेक्षित पराभवाने धक्का बसला. संस्थापकांचे सुपुत्र संग्रामसिंह नलवडे यांचाही धक्कादायक पराभव झाला. निवृत्त कामगारांच्या थकीत देणीसाठी दीड वर्षे आंदोलन करणाऱ्‍या शिवाजी खोत यांनाही दोन्ही गटांत पराभवाला सामोरे जावे लागले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com