Govt Jobs : १० वी, १२ वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी!, पशुसंवर्धन विभागात ३ हजार ४४४ पदांसाठी भरती

BPNL Bharti 2023 : १० वी, १२ वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. पशुसंवर्धन विभागात ३ हजार ४४४ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले आहे.
Govt Jobs
Govt Jobsagrowon
Published on
Updated on

Agriculture Department Job : सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे भारतीय पशुपालन निगम लिमिटेड अंतर्गत सर्वेक्षक आणि सर्वेक्षक प्रभारी पदांसाठी मेगा भरती केली जाणार आहे. या भरतीअंतर्गत ३ हजार ४४४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख याबाबतची माहिती जाणून घेऊया.

Govt Jobs
Goverment job : पशुसंवर्धन विभागात ४४६ पदांसाठी भरती जाहीर

भारतीय पशुसंवर्धन महामंडळ लिमिटेड मध्ये बंपर भरती आली आहे. या भरती परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या सर्व इच्छुक उमेदवारांना 5 जुलैपूर्वी या परीक्षेसाठी अर्ज भरावा लागेल. तुम्हाला या भरतीशी संबंधित सर्व माहिती BPNL च्या   www.bharatiyapashupalan.com अधिकृत वेबसाइटवर मिळेल.

Govt Jobs
Pune ZP Recruitment : अजूनही रखडली ‘झेडपी’ची भरती

किती पदांची भरती होणार

भारतीय पशुपालन निगम लिमिटेड म्हणजेच BPNL ने सर्वेक्षण प्रभारी आणि सर्वेक्षक पदासाठी बंपर भरती काढली आहे. या भरतीमध्ये सर्वेक्षण प्रभारी पदासाठी ५७४ तर सर्वेक्षक पदासाठी २ हजार ८७० जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. ज्यांना सर्वेक्षण प्रभारी पदासाठी अर्ज करायचा आहे, त्या उमेदवारांची वयोमर्यादा २१ ते ४० वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. यासोबतच त्यांचा भारतातील मान्यताप्राप्त महाविद्यालयातून 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर, सर्वेक्षक पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची वयोमर्यादा १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान असावी आणि त्यांनी १० वीची परिक्षा उत्तीर्ण केली असावीा. या भरतीसाठी केवळ 10वी किंवा 12वी उत्तीर्णच अर्ज करू शकतात, असे नाही. तुम्ही यापेक्षा जास्त शिक्षित असाल तरीही तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता.

या भरती परीक्षेची फॉर्म फी किती आहे

भारतीय पशुसंवर्धन महामंडळ लिमिटेडच्या भरती परीक्षेच्या फीबद्दल बोलायचे झाल्यास, उमेदवारांना सर्वेक्षण प्रभारी पदासाठी अर्ज करण्यासाठी ९४४ रुपये शुल्क जमा करावे लागेल. याशिवाय सर्वेक्षक पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचे शुल्क ८२६ रुपये ठेवण्यात आले आहे. सर्व उमेदवारांची निवड ऑनलाइन चाचणी आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्जाची प्रक्रिया सुरू झाली असून अंतिम तारीख ५ जुलै २०२३ आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com