Dhannajay Mahadik : 'गोकुळच्या सत्ताधाऱ्यांमुळे शेतकऱ्यांवर म्हशी विकण्याची वेळ आली'
agrowon

Dhannajay Mahadik : 'गोकुळच्या सत्ताधाऱ्यांमुळे शेतकऱ्यांवर म्हशी विकण्याची वेळ आली'

Shoumika Mahadik : याचिका फेटाळल्यामुळे शौमिका महाडिक यांनी उपस्थित केलेल्या मुद्दयांमध्ये तथ्य असल्याचे दिसून येते. चौकशीत सत्य समोर येईल असेही धनंजय महाडिक म्हणाले.
Published on

Kolhapur District Cooperative Milk Sangh :कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामध्ये (गोकुळ) सत्तांतर झाल्यानंतर अनेक प्रकरणांत गैरव्यवहार झाल्याचा आरोप संचालिका शौमिका महाडिक यांनी केला होता. याबाबत त्यांनी दूध संघाचे चाचणी लेखापरीक्षण करावे, अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली होती. त्यावर गोकुळच्या सत्ताधाऱ्यांनी दावा करत उच्च न्यायालयात याचीका दाखल केली होती.

दरम्यान उच्च न्यायालयाने लेखापरिक्षण होणार असा निकाल दिल्यानंतर गोकुळमध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात पुन्हा एकदा आरोप प्रत्त्यारोपांच्या फैऱ्या झडत आहेत. खासदार धनंजय महाडिक यांनी गोकुळच्या सत्ताधाऱ्यावर जोरदार टीका केली.

यावेळी खासदार महाडिक म्हणाले की, गोकुळचे दूध संकलन कमी झाले आहे. संकलन वाढविण्यासाठी सत्ताधारी प्रयत्न करत आहेत. वीस लाख लिटर दूध संकलन करू, असा दावा करणारे गावोगावी फिरून म्हशी खरेदी करण्याच्या विनवण्या करत आहेत.

परंतु यांच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्यांवर म्हशी विकण्याची वेळ आल्याचा घणाघाती आरोप महाडिक यांनी केला. गोकुळमध्ये कोणताही गैरकारभार नसेल तर चौकशी होण्यास काय अडचण आहे, असा सवालही महाडिक यांनी उपस्थित केला.

Dhannajay Mahadik : 'गोकुळच्या सत्ताधाऱ्यांमुळे शेतकऱ्यांवर म्हशी विकण्याची वेळ आली'
Gokul Milk Kolhapur : गोकुळच्या दूध वाहतूक टेम्पोमधून व्हायची दुधाची चोरी, असा लागला छडा

गोकुळच्या निवडणुकीत विविध गोष्टींची पूर्तता करतो म्हणून सत्ता मिळवली परंतु त्यांना कोणत्याच गोष्टीत यश मिळालं नाही. याचसाठी शौमिका महाडिक गोकुळ वाचवण्यासाठी लढाई करत आहेत. वीस लाख लिटर दूध संकलन करू म्हणणारे गावोगावी फिरून म्हशी खरेदी करण्याची विनंती करत आहेत. परंतु यांच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्यांनी म्हशी विकल्या. त्यामुळे संवाद यात्रेत गावोगावी त्यांना रोषाला सामोरे जावे लागेल, असे महाडिक म्हणाले.

गोकुळच्या चौकशीबाबत ते म्हणाले, लेखापरीक्षणामध्ये ज्या त्रुटी आढळल्या त्यावरून शौमिका महाडिक यांनी चाचणी लेखापरीक्षणाची मागणी केली. त्याला स्थगिती मिळावी म्हणून गोकुळने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर दोन, तीन महिने सुनावणी झाल्यानंतर याचिका फेटाळली.

याचिका फेटाळल्यामुळे शौमिका महाडिक यांनी उपस्थित केलेल्या मुद्दयांमध्ये तथ्य असल्याचे दिसून येते. चौकशीत सत्य समोर येईल. सत्ताधारी असल्यामुळे मंत्री हसन मुश्रीफ अशा प्रकारची भूमिका मांडणे स्वाभाविक आहे, असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com