Team Agrowon
उत्पादन खर्चाइतका देखील काजू बीला दर मिळत नसल्यामुळे काजू उत्पादकांमध्ये नाराजी आहे.
त्यामुळे सावंतवाडी-दोडामार्ग फळबागायतदार संघाने काजू बी ला बाजारपेठेत असलेल्या दरापेक्षा अधिक दोन रुपये दर देण्याचा निर्णय घेतला आहे.
काजू बी सध्या १२०, १२५, १३० असा प्रतिकिलो दर आहे.
परंतु प्रत्यक्षात उत्पादकाला प्रतिकिलो १२२ रुपये खर्च येतो.
त्यामुळे बागायतदाराला प्रतिकिलो १४० रुपये दर मिळावा, अशी अपेक्षा असते. परंतु तरीदेखील काजू बागायतदारांना अपेक्षित दर मिळत नाही.
दोन-तीन वर्षांपासून बागायतदार संघ शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी काजू बी खरेदी करतो.
व्यापारी आणि कारखानदार मिळून काजू बी चा दर ठरवितात.
गोव्यात गावठी काजू बी ला २०० रुपयांपर्यंत दर मिळतो. परंतु सिंधुदुर्गात ही स्थिती नाही.