Agriculture Department : जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात ५० टक्केहून अधिक पदे रिक्त

Agriculture Department News : पारंपरिक पद्धतीने केली जाणारी भातशेती, परकीय चलन देणारे आंबा-काजू बागायतीचे क्षेत्र असलेल्या रत्नागिरी जिल्ह्याचा गाडा हाकणाऱ्या कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयात ५० टक्क्यांहून अधिक पदे रिक्त आहेत
Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon
Published on
Updated on

Ratnagiri News : पारंपरिक पद्धतीने केली जाणारी भातशेती, परकीय चलन देणारे आंबा-काजू बागायतीचे क्षेत्र असलेल्या रत्नागिरी जिल्ह्याचा गाडा हाकणाऱ्या कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयात ५० टक्क्यांहून अधिक पदे रिक्त आहेत.

७८८ मजूर पदांपैकी ३२३ पदे भरलेली असून ४६५ पदे रिक्त आहेत. नुकत्याच झालेल्या बदल्यांमध्येही नवीन अधिकारी, कर्मचारी नियुक्त झालेले नाही. येत्या खरीप हंगामासह भविष्यात कृषी विभागाचा गाडा कसा चालवायचा असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

खरीप हंगाम जवळ आला असल्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून प्रात्यक्षिके, बांधावर खतांचे वितरण, शेतकऱ्यांना भात बियाणे उपलब्ध करून देणे, विम्याचा लाभांश देण्यासाठी प्रयत्न, नुकसान झालेल्या भागांचा सर्व्हे, कीड-रोग पसरलेल्या भागात शेतकऱ्यांना मार्गदर्शन यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठका, मंत्र्यांना द्यावे लागणारे अहवाल अशा बाबींची पूर्तता करताना अधिकारी, कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागत आहे.

Agriculture Department
Agriculture Department : कृषी विभागाची भरारी पथके सज्ज

काही दिवसांपूर्वी कृषी विभागातील राज्यस्तरावरील बदल्या झाल्या. त्यामध्ये परजिल्ह्यातून रत्नागिरीतील रिक्त पदांवर नियुक्त्या होतील अशी आशा होती; परंतु एकही नवीन अधिकारी आलेला नाही.

जिल्ह्यात कृषी उपसंचालक, कृषी विकास अधिकारी, प्रकल्प उपसंचालक आत्मा १ व २, उपविभागीय कृषी अधिकारी रत्नागिरी, उपविभागीय कृषी अधिकारी चिपळूण अशी एकूण सहा पद रिक्त असतानाही एकही अधिकारी दाखल न झाल्याने प्रभारींवरच अवलंबून राहावे लागणार आहे.

Agriculture Department
Agriculture Department : केंद्र, राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत २९ कोटी २२ लाखांवर निधी खर्च

डोंगराळ प्रदेश असल्याने अधिकाऱ्यांना गावागावात भेटी देण्यासाठी तारांबळ उडते. तालुका कृषी अधिकाऱ्यांची पाच पद रिक्त असल्यामुळे सध्या प्रभारींवरच सर्व भार आहे.

कृषी विभागामध्ये कृषी सहायक हे पद अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्यांवर तोडगा काढणाऱ्या या अधिकाऱ्यांची ५० टक्के पदे रिक्त आहेत.

३६३ पैकी १७७ पदे भरलेली आहेत. १८६ पदे रिक्त असल्यामुळे कृषी विभागाची मोठीच पंचाईत झाली आहे. याकडे पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावे अशी अपेक्षा कृषी विभागाकडून व्यक्त केली जात आहे.

संवर्ग---मंजूर पदे---भरलेली---रिक्त

गट अ---६---३---३

गट ब---२२---५---१७

गट क---५९८---२५१---३४७

गट ड---११८---३०---८८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com