
नागपूर : ‘‘महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रामुख्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) प्रमुख ५० नेत्यांचे भले झाले. त्या खालचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज असल्याने आघाडीला आणखी धक्के बसतील,’’ असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrshekhar Bawankule) यांनी दिला.
कॉंग्रेसचेही मोठे मोठे नेते आमच्या पक्षात येतील. निवडणूक जवळ येईल, तसतसे कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे नेते आमच्याकडे येत जातील, असेही त्यांनी सांगितले. अशोक चव्हाण यांनी एकनाथ शिंदेंबाबत केलेल्या वक्तव्याबाबत बावनकुळे म्हणाले,
‘‘उद्धव ठाकरे सरकार आणि शिवसेना चालवीत होते. एकनाथ शिंदे चालवीत नव्हते. अशोक चव्हाण आता एकनाथ शिंदेंचे नाव घेऊन संभ्रम निर्माण करीत आहेत. चव्हाण यांनी उद्धव ठाकरेंचे नाव घेतले पाहिजे.’’
‘‘चंद्रकांत खैरे हे उद्धव ठाकरेंचे विश्वासू आहोत, हे सिद्ध करण्यासाठी धडपड करीत आहेत,’’ अशी टीकाही त्यांनी केली. ‘‘२०१४ किंवा २०१९ मध्ये जे काही झाले, भारतीय जनता पक्षासोबत
जे षडयंत्र झाले, त्याला शिवसेना पक्षप्रमुखांचे संरक्षण होते. कारण प्रमुख व्यक्तीचे संरक्षण असल्याशिवाय असे प्रकार होत नाहीत. उद्धव ठाकरे यांनीच २०१९ मध्ये तो कट केला असेल, म्हणून असे झाले असावे,’’ असेही बावनकुळे या वेळी म्हणाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.