Crop Insurance : पीकविम्‍यात गतवर्षीपेक्षा अधिक सहभाग

Crop Insurance Scheme : खरिपासाठी पंतप्रधान पीकविमा योजना राबवली जात आहे. नगर जिल्ह्यात यंदा गेल्या वर्षीपेक्षा अधिक शेतकरी सहभागी होत आहेत.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon
Published on
Updated on

Nagar News : खरिपासाठी पंतप्रधान पीकविमा योजना राबवली जात आहे. नगर जिल्ह्यात यंदा गेल्या वर्षीपेक्षा अधिक शेतकरी सहभागी होत आहेत. अजून आठ दिवसांचा अवधी असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे अवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी पत्रकार परिषदेत केले.

नगर येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सुधाकर बोराळे म्हणाले, की नगर जिल्ह्यात खरिपाची पेरणी चांगली झाली आहे. अजूनही पेरा सुरू आहे.

यंदाही सरासरीपेक्षा अधिक पेरणी होईल असा कृषी विभागाचा अंदाज आहे. यंदा खरिपासाठी भात, बाजरी, भूईमूग, सोयाबीन, मूग, तूर, उडीद, कापूस, मका, कांदा या पिकांसाठी पंतप्रधान पीकविमा योजना राबवली जात आहे.

Crop Insurance
Crop Insurance : पीक विमा योजनेसंबधी शेतकऱ्याने लिहीले पंतप्रधानांना पत्र

३१ जुलैपर्यंत पीकविमा भरण्याची तारिख आहे. २१ जुलैपर्यंत जिल्ह्यातील ४ लाख १ हजार १२४ शेतकऱ्यांनी पीकविमा भरला आहे. गेल्या वर्षी केवळ २ लाख २३ हजार २२६ शेतकरी सहभागी झाले होते. यंदा अजून विमा भरण्यासाठी आठ दिवसांचा अवधी आहे. त्यामुळे पाच लाखांपेक्षा अधिक शेतकरी यात सहभागी होतील यासाठी कृषी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.

Crop Insurance
Crop Insurance : शेतकऱ्यांनी पीकविमा उतरवणे काळाची गरज

कृषी विभागाचे अधिकारी, विमा प्रतिनिधी तसेच कृषी सहाय्यक गावगावांत जाऊन पीक विम्याबाबत माहिती देत आहे. आतापर्यंत नगर जिल्ह्यात २ लाख ३० हजार ७३ हेक्टरवर क्षेत्र पीकविम्यातून संरक्षित झाले आहे.

४६ हजार ९९६ हेक्टरवर कापसाचा विमा उतरवला असून १४ हजार ५०० हेक्टरवर बाजरीचा, तुरीचा २६ हजार हेक्टरवर, कांद्याचा ७ हजार ३१३ हेक्टर, सोयाबीनचा ६८ हजार ४०७ हेक्टर, मुगाची १६ हजार ७७० हेक्टरवर विमा उतरवला आहे.

आतापर्यंत विम्यापोटी १३५ कोटी १३ लाख रुपये शासन विमा कंपनीला भरणार आहे. ९६६ कोटी रुपये यामुळे संरक्षित झाले असल्याचे सुधाकर बोराळे म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com