Monsoon : मॉन्सून लवकरच देशाचा निरोप घेण्याची शक्यता!

Monsoon Back : विदर्भ आणि कोकणाचा काही भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्रातून मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. लवकरच मॉन्सून राज्यासह संपूर्ण देशाचा निरोप घेण्याची शक्यता आहे.
Monsoon Update
Monsoon UpdateAgrowon
Published on
Updated on

Monsoon Return : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी म्हणजेच मॉन्सूननं सोमवारी बहुतांश महाराष्ट्रातून काढता पाय घेतला आहे. विदर्भ आणि कोकणाचा काही भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्रातून मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. लवकरच मॉन्सून राज्यासह संपूर्ण देशाचा निरोप घेण्याची शक्यता आहे. 

राज्यात पावसानं मुख्यत: उघडीप दिल्यामुळे उन्हाच्या चटक्यात वाढ झाली. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात उन्हाचा पारा पस्तीशीच्या पार गेला आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवस उघडीप राहण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यासोबतच उन्हाचा चटक्यात वाढ होऊ शकते असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. पावसाने उघडीप दिल्यामुळे राज्यातील अनेक भागात सध्या पीक काढणीची कामं सुरू आहेत. 

Monsoon Update
Rain Update : नगर जिल्ह्यातील ३६ महसूल मंडलांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस

दीर्घकालीन सर्वसाधारण वेळेच्या आठ दिवस उशिराने २५ सप्टेंबर रोजी मॉन्सूनने राजस्थानमधून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. शुक्रवारी (ता.६) सर्वसाधारण वेळेच्या चार दिवस अगोदरच मॉन्सून जवळपास निम्म्या महाराष्ट्रातून परतला होता.तर सोमवारी मॉन्सूनने जवळपास संपूर्ण महाराष्ट्रातून माघार घेतली. साधारणतः वेळेनुसार मॉन्सून १० ऑक्टोबरपर्यंत राज्याच्या बहुतांशी भागातून माघार घेतो. यंदा ११ जून रोजी महाराष्ट्रात दाखल झालेल्या वाऱ्यांनी २५ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला होता.

सोमवारी पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड, तेलंगणा, उत्तर अंतर्गत कर्नाटकसह महाराष्ट्राच्या बहुतांशी भागातून माघार घेतली आहे.मॉन्सूनची परतीची सीमा रक्सोल, डाल्टेनगंज, कंकेर, रामगुंडम, विजापूर ते वेंगुर्लापर्यंत पोहोचली आहे. मॉन्सूनच्या परतीची वाटचाल सुरू असून, लवकरच संपूर्ण देशभरातून मॉन्सून परतणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com