Cooperative : संतुलित प्रगतीसाठी सहकाराचेच मध्यममार्गी मॉडेल उपयुक्त

भारतीय राष्ट्रीय सहकारी संघातर्फे शंभराव्या आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी हे प्रतिपादन केले.
Cooperative
Cooperative Agrowon

नवी दिल्ली ः साम्यवाद आणि भांडवलवाद (Capitalism) ही आर्थिक प्रारूपे असंतुलित विकासाची असून भारतासारख्या देशात ७० कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी आणि संतुलित प्रगतीसाठी सहकाराचेच मध्यममार्गी मॉडेल (Cooperative) उपयुक्त आहे, असा दावा गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी सोमवारी (ता. ४) केला.

Cooperative
सहकार कायद्यात पुन्हा हवा बदल

भारतीय राष्ट्रीय सहकारी संघातर्फे शंभराव्या आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी हे प्रतिपादन केले. तसेच देशातील सहकार क्षेत्रामध्ये आगामी काळात होणाऱ्या बदलांचेही सुतोवाच केले. सहकारी संघाचे अध्यक्ष दिलीप संघानी, सहकारीता खात्याचे राज्यमंत्री बी. एल. वर्मा हेदेखील या वेळी उपस्थित होते.

Cooperative
सहकार क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टीकोन व्यापक हवा

अमित शाह म्हणाले, की कोणत्याही कायद्याचा ५० वर्षानंतर फेरआढावा घेणे आवश्यक असते. तसे झाले नाही तर उपयोगाचे नसते. कारण एवढ्या प्रदीर्घ काळात समाजात बदल होत असतो. सहकार कायद्याबद्दलही तसेच झाले. आहे. या क्षेत्रात सुधारणेसाठी पंतप्रधान मोदींनी स्वतंत्र सहकारिता मंत्रालय तयार केले. आत्मनिर्भरतेच्या मुळाशी व्यक्तीचे आर्थिक स्वावलंबनदेखील आहे. यासाठी सहकाराचे वर्तमान स्वरूप बदलावे लागेल. तसेच काही कठोर नियंत्रणेही आणावी लागतील, असे सुतोवाच त्यांनी केले.

साम्यवाद आणि भांडवलवादाची आर्थिक प्रारूपे असंतुलित विकासाची असल्याचे सांगताना सहकार आंदोलन अपयशी झाले ही धारणा अत्यंत चुकीची आहे, असेही प्रतिपादन शाह यांनी केले. न्यूझीलंड, नेदरलँड, फ्रान्स, फिनलंड या देशांच्या ढोबळ देशांतर्गत उत्पन्नात (जीडीपी) मध्ये सहकाराचे योगदान १४ ते १८ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याची आकडेवारी त्यांनी मांडली. तर जगभरातील ३०० प्रमुख सहकारी कंपन्यांमध्ये भारताच्या इफ्को, अमूल आणि कृभको या तीन कंपन्यांचा सहकारी कंपन्यांचाही समावेश आहे, याकडे लक्ष वेधताना जगातील बारा टक्के लोकसंख्या सहकारावर अवलंबून असल्याचेही ते म्हणाले.

तत्पूर्वी, माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा खासदार सुरेश प्रभू यांनी सहकार क्षेत्राची सद्यःस्थिती मांडणी करताना त्यातील बदलांची आवश्यकता व्यक्त केली होती. व्यक्ति केंद्रित विकासासाठी सहकाराखेरीज दुसरा कोणताही पर्याय नाही, असे प्रतिपादन करताना सुरेश प्रभू यांनी सहकार क्षेत्रात उत्तरदायित्व आणि पारदर्शकतेचा अभाव असल्यावर बोट ठेवताना या क्षेत्रामध्ये व्यावसायिकपद्धतीने व्यवस्थापनाची नितांत आवश्यकता असल्याची मांडणी केली. तसेच, सहकाराबाबत सरकारची भूमिका हस्तक्षेप न करणाऱ्या समजूतदार पालकाची असावी असेही म्हटले होते.

काँग्रेसवर हल्लाबोल!

सहकार दिनाच्या व्यासपीठावर मंत्री अमित शाह यांनी सत्ताधारी भाजपची भलामण करताना काँग्रेसवरही शरसंधान केले. देशात ७० टक्के लोक गरीब मानले जातात. त्यांच्या समृद्धीसाठी सहकाराशिवाय पर्याय नाही. काँग्रेसचे नेते गरिबी हटावच्या घोषणा देत राहिले पण गरिबी हटली नाही. कारण त्यात निष्ठा नव्हती, असा टोला अमित शाह यांनी लगावला. तसेच, २०१४ नंतर त्यात सुधारणा झाली असा दावाही केला. देशभरातील कृषी सहकारी पतसंस्थांना बहुद्देशीय बनविणार असून त्यासाठीच्या नियमांचा मसुदा राज्यांना पाठविला आहे, असे त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com