Weather Update : राज्यातील किमान तापमानात चढ-उताराची शक्यता

अरबी समुद्रातील कमी दाबाची प्रणाली किनाऱ्यापासून दूर जात आहे. राज्यात असलेल्या ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानातील वाढ कायम आहे.
 Weather Update
Weather UpdateAgrowon
Published on
Updated on

पुणे : अरबी समुद्रातील कमी दाबाची प्रणाली किनाऱ्यापासून दूर जात आहे. राज्यात असलेल्या ढगाळ वातावरणामुळे (Cloudy Weather) किमान तापमानातील वाढ कायम आहे. आजपासून (ता. १५) राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानासह तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

 Weather Update
राज्याच्या तापमानात चढ-उताराची शक्यता

उत्तरेकडील राज्यांमध्येही गारठा कायम असून, राजस्थानमधील चुरू येथे बुधवारी (ता. १४) देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत नीचांकी ४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात मात्र किमान तापमानात मोठी वाढ झाली असून, महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १६.५ अंश सेल्सिअस होते. उर्वरित राज्यात किमान तापमान १६ ते २६ अंशांच्या दरम्यान होते.

वादळी प्रणालीच्या प्रभावामुळे राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली आहे. बुधवारी (ता.१४) राज्याच्या बहुतांशी भागात ढगाळ वातावरण कायम होते. आज (ता. १५) पावसाळी वातावरण निवळण्याची शक्यता असून, कमाल व किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

 Weather Update
Hawaman Update : किमान, कमाल तापमानात चढ-उतार सुरूच | ॲग्रोवन


कमी दाबाचे क्षेत्र होतेय तीव्र
पूर्व मध्य बंगालच्या अरबी समुद्रात ठळक कमी दाबाचे क्षेत्र असून, त्याला लागून चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या प्रणालीची तीव्रता वाढत असून, ही प्रणाली भारताच्या किनाऱ्यापासून दूर जात आहे. तर दक्षिण अंदमान समुद्रात सुमात्रा बेटांजवळ समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे आज (ता. १५) कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता आहे.

बुधवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २८.२ (१८.३), जळगाव ३१.६ (२१.७), धुळे ३२.० (१९.०), कोल्हापूर २६.८ (२१.०), महाबळेश्वर २०.६(१६.५), नाशिक २९.७ (२०.८), निफाड २९.८ (२१.५), सांगली २८.२ (२१.३), सातारा २५.८(१६.१), सोलापूर ३१.२ (२०.५), सांताक्रूझ ३४.५(२५.६), डहाणू ३४.३ (२४.३), रत्नागिरी ३४.५ (२५.८), औरंगाबाद २९.२ (१८.०), नांदेड ३०.८ (२१.२), उस्मानाबाद २९.६ (१९.०), परभणी ३०.२ (२०.६), अकोला ३१.८ (२२.६), अमरावती २९.० (२०.३), बुलडाणा २८.८ (२१.४), ब्रह्मपुरी ३२.७ (२०.८), चंद्रपूर ३०.० (२०.८), गडचिरोली ३१.०(१८.६), गोंदिया २९.५(१९.२), नागपूर ३०.६ (२०.६), वर्धा ३१.५(२०.५), यवतमाळ ३१.० (२०.५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com