Mahad Rain Update : महाडमधील नागरिकांचे स्थलांतर

Heavy Rain in Mahad : आठवडाभरापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तसेच इर्शाळवाडीतील दुर्घटनेनंतर दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांचे स्थलांतर करण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत.
Mahad News
Mahad News Agrowon
Published on
Updated on

Mahad Monsoon News : आठवडाभरापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तसेच इर्शाळवाडीतील दुर्घटनेनंतर दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांचे स्थलांतर करण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत.

महाड तालुक्यातील १९८ कुटुंबातील ५५१ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. यातील काही नागरिक तात्पुरत्या स्थलांतरित केंद्रामध्ये तर काही आपल्या नातेवाइकांकडे स्थलांतरित झाले आहेत.

खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीत दरड कोसळून झालेल्‍या दुर्घटनेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला. त्‍यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून दरडप्रवण क्षेत्रातील धोकादायक गावातील नागरिकांचे तातडीने स्थलांतर करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

Mahad News
Mahad Rain : पावसाच्या तडाख्यात घर कोसळले

महाड तालुक्यातही सध्या मुसळधार पाऊस पडत असल्याने तालुक्यातील कोथेरी-जंगमवाडी व तांदळेकरवाडी येथील काही घरांमध्ये डोंगर माथ्यावरचे पाणी झिरपून जमिनीतून वर येत असल्याची घटना निदर्शनास आल्याने येथील नागरिकांनाही स्थलांतरित करण्यात आले आहे.

Mahad News
Mahad Flood Condition : महाडमध्‍ये नागरिकांचे स्‍थलांतर

महाडमधील चौदा गावांतील १५७ कुटुंबांतील ४१५ ग्रामस्थांना तात्पुरत्या निवारा शेड, शाळा ,मंदिरे अशा सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहेत. तसेच ४१ कुटुंबातील १३६ ग्रामस्थ आपल्या नातेवाईकांकडे स्थलांतरित झाले आहेत.

महाड तालुक्यातील लोहर तुडील-नमावले कोंड, शिंगर कोंड मोरेवाडी, आंबिवली पातेरेवाडी, कोंडीवते ,मुठवली, रोहन,कोथेरी गावठाण, जंगमवाडी व तांदळेकरवाडी, कोसबी, मोहोत सुतारवाडी, दासगाव भोईवाडा, गोंडाळे कुडवेवाडी व मांडले येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी डॉक्टर ज्ञानोबा बानापुरे यांनी या वेळी दिली.

प्रत्येक स्थलांतरित केंद्रामध्ये एका अधिकाऱ्याची पालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे स्थलांतरित नागरिकांना काही अडचण आल्‍यास ती त्‍वरित दूर केली जाईल, त्‍यांच्या राहण्याची-खाण्याची व्यवस्‍था करण्यात आली असून कुणाचीही गैरसोय होणार नाही.
- महेश शितोळे, तहसीलदार, महाड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com