Mahad Flood Condition : महाडमध्‍ये नागरिकांचे स्‍थलांतर

Heavy Rain Mahad : वाढती पूर परिस्थिती व ग्रामीण भागात पूर व दरडीचा धोका लक्षात घेता, प्रशासनाने शहर व तालुक्यातील ११५ कुटुंबातील ४०४ व्यक्तींना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले आहे.
Mahad News
Mahad News Agrowon
Published on
Updated on

Mahad News : वाढती पूर परिस्थिती व ग्रामीण भागात पूर व दरडीचा धोका लक्षात घेता, प्रशासनाने शहर व तालुक्यातील ११५ कुटुंबातील ४०४ व्यक्तींना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले आहे. मुसळधार पावसामुळे महाड तालुक्यातील अनेक पुलांवरून पाणी जात आहे तर पाचाड घाट व मुंबई-गोवा महामार्गावर काफिला बंदर या ठिकाणी दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.

Mahad News
Maharashtra Rain Update : चांगल्या पावसाची शक्यता

शहरामध्ये पूरसदृश स्‍थिती निर्माण झाली असून भीमनगर, वीरेश्वर झोपडपट्टी तर दादली पूल झोपडपट्टी येथील ७० नागरिकांना सुरक्षित स्‍थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. तालुक्यातही पावसाचा जोर वाढल्याने पूर परिस्थिती व दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेता अकरा गावांतील ४०४ नागरिकांना हलविण्यात आल्याची माहिती महाडचे तहसीलदार महेश शितोळे यांनी दिली. नागरिकांना भोजन व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Mahad News
Maharashtra Rain Update : कोकण, मराठवाडा, विदर्भात पावसाचे तांडव

अनेक पूल पाण्याखाली

महाड शहर तसेच तालुक्यांमध्ये अनेक पुलावरून पाणी गेल्याने त्या ठिकाणची वाहतूक बुधवारी ठप्प झाली. शहरातील दादली पूल तसेच गांधारी नदीवरील पुलावरून पाणी गेल्याने महाड शहराचा इतर भागांशी संपर्क तुटला आहे.

दापोली-पंदेरी या मार्गावरील कमी उंचीच्या पुलावरून पाणी गेल्याने दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे. महाड म्हाप्रळ मार्गावरील रावढळ पुलावर देखील सुमारे अडीच फूट पाणी होते. त्यामुळे या मुख्य मार्गावरील सर्व वाहतूक ठप्प होती.

पाचाड घाटमार्ग बंद

रायगड किल्‍ला मार्गावरील पाचाड घाटामध्ये दरड कोसळल्याने रस्‍ता मार्ग बंद झाला होता. प्रशासनाने तातडीने दरड हटवण्याचे काम पूर्ण करून मार्ग सुरू केला. मुंबई-गोवा महामार्गावर काफीला बंदर येथे दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळित झाली होती.

दरड हटविण्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात आले. शिवथरघळ ते बिरवाडी रस्त्यावर बारसगावाजवळ रस्ता तुटल्याने वाहन चालकांना त्रास सहन करावा लागला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com