
अमरावती : पीएम मित्रा योजनेतील (PM Mitra Scheme) टेक्स्टाईल पार्क अमरावतीलाच (Amravati Textile Park) होणार असल्याचा दावा करतानाच माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख (Dr. Sunil Deshmukh) यांनी चुकीच्या माहितीवर खोटे आरोप केल्याचा प्रत्यारोप भाजपचे शहराध्यक्ष किरण पातूरकर यांनी केला.
माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन अमरावतीचा प्रकल्प औरंगाबाद येथे पळविण्यात येत असल्याचा आरोप केला होता. त्याचे खंडण करण्याकरिता भाजपने पत्रकार परिषद घेत प्रत्यारोप केलेत. या वेळी आमदार व माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे, आमदार प्रताप अडसड, जयंत डेहनकर प्रामुख्याने उपस्थित होते. किरण पातूरकर यांनी अमरावतीला पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्क देण्यात यावा, अशी मागणी आपण स्वतः केली होती, असाही दावा या वेळी केला.
पातूरकर म्हणाले, की एमआयडीसीच्या सीईओंनी १४ जूनला अमरावती व औरंगाबाद येथे या प्रकल्पाचा प्रस्ताव पाठविला. त्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार होते. तत्कालीन विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी २५ मे रोजी अमरावतीसाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांना पत्र पाठविले होते. त्यामुळे औरंगाबादसाठी पाठविलेला प्रस्ताव महाविकास आघाडीच्या सरकारनेच पाठविला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे विदर्भद्रोही असल्याचाही आरोप पातूरकर यांनी केला. सर्व वस्तुस्थिती डॉ. सुनील देशमुख यांनी लपवून केवळ आरोप केलेत, असेही ते या वेळी म्हणाले.
अमरावतीला का होणार पार्क
अमरावतीच्या नांदगावपेठ एमआयडीसीमध्ये सीईटीपी असल्याने व औरंगाबादला ते नसल्याने अमरावतीची बाजू भक्कम आहे. टेक्स्टाईल पार्कसाठी हा सीईटीपी असणे आवश्यक असून तो उभारण्यास तीन वर्षे लागतात. अमरावतीला तो आधीच असल्याने पीएम मित्रा योजनेतील मेगा टेक्स्टाईल पार्क येथेच होणार असल्याचा दावा आमदार प्रवीण पोटे यांनी यावेळी केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.