आदिवासी विद्यार्थ्यांना वैद्यकीय, अभियांत्रिकीचे धडे

‘झेडपी’ राबविणार ‘सुपर ५०’ उपक्रम
Medical, engineering Education for tribal students
Medical, engineering Education for tribal studentsAgrowon

नाशिक : आदिवासी विकास विभागाच्या धर्तीवर नाशिक जिल्हा परिषदेकडून (Nashik Zila Parishad ) ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील निवडक ५० विद्यार्थ्यांना वैद्यकीय आणि अभियांत्रिकीचे धडे (Medical, engineering Education for tribal students) गिरविण्याची संधी मिळणार आहे. यासाठी ‘सुपर ५०’ उपक्रम राबवणार असून मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल (Ashima Mittal) यांनी यासाठी पुढाकार घेतला.

Medical, engineering Education for tribal students
आदिवासी पाड्यांवर अळिंबी उत्पादनाचे धडे

या उपक्रमांतर्गत अनुसूचित जाती/जमाती या प्रवर्गातील २०२२-२३ मध्ये इयत्ता ११ वी विज्ञान शाखेतील अनुदानित, अंशतः अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालये, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांकरिता नियमित अभ्यासक्रमाबरोबर सीईटी, जेईई या परीक्षेकरिता प्रशिक्षण आणि मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

Medical, engineering Education for tribal students
गुजरातमध्ये विद्यार्थी गिरवणार सेंद्रीय शेतीचे धडे

उपक्रमांच्या अटी अशा :
- विद्यार्थी ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व जमाती या प्रवर्गातील असावा.
- विद्यार्थी नाशिकमध्ये ११ वी विज्ञान शाखेत (आश्रमशाळा, अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, उच्च माध्यमिक विद्यालय) प्रवेशीत असावा विद्यार्थ्यास इयत्ता १० वीत किमान ६५ टक्के गुण प्राप्त झालेले असावे.
- इच्छुक विद्यार्थ्यास दोन वर्षासाठी प्रशिक्षण व सर्व अध्यापन निवासी शाळेत निःशुल्क असेल.
- इच्छुक विद्यार्थ्यांना निवड चाचणी परीक्षा बंधनकारक राहील.
- निवड चाचणी परीक्षेत मेरिटनुसार उच्चतम गुण मिळालेल्यांची निवड होईल.

 ऑनलाइन नोंदणी
या उपक्रमांतर्गत पूर्व परीक्षेला बसण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करायची आहे. त्याचसोबत विहित नमुन्यात विद्यार्थ्यांना आपल्या महाविद्यालयाकडेदेखील ४ नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे. नोंदणीसाठी https://forms.gle/p4n4suWvFQSM३iR५७ येथे संपर्क साधावा.
ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी चांगल्या संधी उपलब्ध व्हाव्यात या हेतुने ‘सुपर ५०’ उपक्रम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हाती घेण्यात आला आहे.
- आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com