

Washim News : पावसाळ्यात पूरपरिस्थितीत इतर गावांशी संपर्क तुटतो. यापुढे पुराने गावे बाधित होणार नाही, तसेच त्या गावांचा इतर गावांशी संपर्क तुटणार नाही, यासाठी तालुकास्तरीय यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे काम आतापासूनच करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी दिले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सभेत श्रीमती बुवनेश्वरी बोलत होत्या. या वेळी उपवनसंरक्षक अभिजित वायकोस, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धर्मपाल खेळकर उपस्थित होते.
ज्या गावांना पुराचा धोका निर्माण होतो व जी गावे नदी काठावर वसलेली आहे, तेथे पूर संरक्षक भिंत बांधणे व इतर कामे करण्यासाठी संबंधित विभागाने प्रस्ताव सादर करावे. या पावसाळ्यात जे सिंचन प्रकल्प ओव्हरफ्लो झाले त्या प्रकल्पातील गाळ या वर्षी प्राधान्याने काढण्यात यावा. प्रकल्पाच्या भिंतीवर वाढलेली झाडे तोडण्यात यावी.
गावातील नालेसफाई वेळोवेळी करण्यात यावी. ज्यामुळे नाल्या तुंबणार नाही व पुराचे पाणी गावात येणार नाही. संबंधित यंत्रणांनी करण्यात येणाऱ्या कामांचे अंदाजपत्रके दोन आठवड्याच्या आत मान्यतेसाठी सादर करावे. असे त्या म्हणाल्या.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.