Pune APMC : पुणे बाजार समितीमधील डमी अडत्यांवर कारवाई होणार

APMC News : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने डमी अडत्यांचा सुळसुळाट झाला असून, या डमी अडत्यांकडून घाऊक बाजाराला हरताळ फासला जात आहे.
Pune APMC
Pune APMC Agrowon
Published on
Updated on

Pune News : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने डमी अडत्यांचा सुळसुळाट झाला असून, या डमी अडत्यांकडून घाऊक बाजाराला हरताळ फासला जात आहे.

डमींमुळे घाऊक बाजार हा किरकोळ बाजार झाला आहे. याचा फटका बाजार आवारातील घाऊक व्यवहाराला बसला असून, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बाजार समिती प्रशासन सरसावले आहे.

डमी अडत्यांवर कारवाई करण्यासाठी आणि शेतीमालाच्या दुबार विक्रीवर निर्बंध घालण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, मात्र या प्रयत्नांना कितपत यश येईल यावर साशंकता आहे.

पुणे बाजार समितीमधील अनेक पारंपरिक आणि पिढीजात अडत्यांनी हॉटेल, रिअल इस्टेट, बांधकाम व्यवसायात पदार्पण केले आहे. यामुळे अनेकांनी आपले गाळे भाडेतत्त्वावर दिले आहेत. तर अनेक जण केवळ गाळ्यावर येण्याचे काम करत असतात.

Pune APMC
Pune APMC Update : पुणे बाजार समिती सकाळी दहा वाजता बंद

भाडेतत्त्वावर दिलेल्या गाळ्यांवर अनेक डमी अडते गेल्या अनेक वर्षांपासून किरकोळ व्यवसाय करीत आहेत. बाजार समितीमधूनच शेतीमाल खरेदी करायचा आणि तो किरकोळ स्वरूपात विक्री करण्याचा सर्रास उद्योग सुरू आहे. यामध्ये विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या गाळ्यावर हे प्रकार सर्रास सुरू आहेत.

बाजार समितीमधील फळे-भाजीपाला विभागात साधारण ७५० गाळे आणि सुमारे तेवढेच परवानाधारक अडते आहेत. मात्र एका गाळ्यावर किमान पाच ते सात डमी असे एकूण दोन हजारांवर डमी अडते कार्यरत आहेत. या अडत्यांमुळे बाजार आवारातील वाहतूक कोंडी होत असल्याच्या अनेक तक्रारीदेखील यापूर्वी आल्या होत्या.

Pune APMC
Pune APMC : सकाळी दहाला बाजार बंद करण्यावरून मतभिन्नता

मात्र गेल्या अनेक वर्षांच्या या कार्यपद्धतीवर नव्याने आलेल्या संचालक मंडळाची वक्रदृष्टी झाली आहे. या अडत्यांवर कारवाईचे संकेत बाजार समिती प्रशासनाने दिले असून, एका परिपत्रकाद्वारे प्रत्येक गाळ्यावर परवानाधारक अडते आणि दोन सहायक यांनाच व्यवसाय करण्याचा नियम करण्यात आला आहे.

या नियमानुसार संबंधित परवानाधारक अडत्यांनी दोन सहायक कामगारांचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. या आदेशामुळे देखील संचालक मंडळ आणि अडते यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

विविध पदाधिकाऱ्यांच्या गाळ्यावर डमींची संख्या सर्वाधिक

बाजार आवारातील विविध संघटनांचे पदाधिकारी स्वतः व्यवसाय करीत नसल्याचे गेल्या अनेक वर्षांचे चित्र आहे. या पदाधिकाऱ्यांच्या गाळ्यावर ५ ते ७ डमी अडते कार्यरत आहेत. या पदाधिकाऱ्यांच्या गाळ्यावरील डमींवर कारवाई होणार का, याकडे बाजार घटकांचे लक्ष लागले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com