
Nagar News : कांद्याचे उत्पादन घेताना माती, पाणी आणि बियाणे यांचे नाते ओळखणे गरजेचे आहे. दर्जेदार कांदा उत्पादन वाढ आणि त्याची टिकवण क्षमता वाढीसाठी माती, पाणी यासोबत दर्जेदार बियाणे, खताच्या योग्य मात्रा याचा अभ्यास करणे गरजेचे आहे.
कांदा एकात्मिक व्यवस्थापनात जमिनीची सुपीकता वाढविण्यासह ती टिकण्यासाठी सेंद्रिय खताचीही गरज आहे, असे मत कृषी पर्यवेक्षक बाळासाहेब काकडे यांनी व्यक्त केले.
नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथील भैरवनाथ शेतकरी उत्पादक कंपनीच्या सभागृहात ‘अॅग्रोवन’ व ‘कोरोमंडल इंटरनॅशलन लिमिटेड’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कांदा पीक एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन’ या विषयावर शेतकऱ्यांना ‘अॅग्रोवन संवाद’ कार्यक्रमातून मार्गदर्शन करण्यात आले.
कृषी पर्यवेक्षक बाळासाहेब काकडे, कोरोमंडल इंटरनॅशनलचे विभागीय कृषी विद्यावेत्ता डॉ. विनेश रेगे, विभागीय व्यवस्थापक समाधान बुधवत, कृषी विद्यावेत्ता डॉ. विक्रम कापसे, विपणन अधिकारी विक्रम एकोंडे, क्षेत्रीय सहायक अमोल घुले, भैरवनाथ शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष राजेंद्र लांडगे, दीपक लांडगे उपस्थित होते.
डॉ. रेगे म्हणाले, ‘‘कांद्याच्या एकात्मिक व्यवस्थापनात सेंद्रिय व रासायनिक खताची गरज असते. शेणखत वापरलेच पाहिजे, मात्र अनेक शेतकऱ्यांना शेणखत उपलब्ध होत नाही. त्यावर कोरोमंडलने पर्याय म्हणून खते उपलब्ध केली आहेत.
कोरोमंडलचे ग्रोस्मार्ट, ग्रोप्लस व ग्रोशक्ती वापरून मातीचा सेंद्रिय कर्ब वाढवता येईल. खरे तर हा कर्ब ०.७ पेक्षा अधिक हवा मात्र सध्या बहुतांश ठिकाणी ०.४ पेक्षाही कमी सेंद्रिय कर्ब आहे. वाढीसाठी जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढणे गरजेचे आहे. त्यासाठी कोरोमंडलने खते उपलब्ध केली आहेत.
या वेळी कृषी सहायक प्रशांत गुंड, दत्तात्रय कुमटकर, साहेबराव म्हस्के, जालिंदर लांडगे, शिवाजी शिंदे, अभयकुमार लांडगे, मोहमंद शेख, गुलाब लांडगे, पंढरीनाथ लांडगे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘सकाळ-अग्रोवन’चे जिल्हा बातमीदार सूर्यकांत नेटके यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन सीनियर एक्झिक्युटिव्ह सैफ शेख व सचिन तवले यांनी केले. तर विक्रम एकोंडे यांनी आभार मानले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.