Mahavitaran Employee Strike : संप काळात सुरळीत वीज पुरवठ्यासाठी महावितरण प्रयत्नशील

समांतर वीज वितरण परवान्याला विरोध दर्शवित महावितरणच्या कर्मचारी, अभियंता, अधिकारी कृती समितीद्वारे राज्यव्यापी संपाची घोषणा केली आहे.
Mahavitaran
MahavitaranAgrowon

अकोला ः समांतर वीज वितरण परवान्याला विरोध दर्शवित महावितरणच्या कर्मचारी, अभियंता, अधिकारी कृती समितीद्वारे राज्यव्यापी संपाची (Mahavitaran Strike) घोषणा केली आहे. या संपात अकोला परिमंडळातील कर्मचारी सहभागी झाले आहेत.

त्यामुळे ७२ तासांच्या संप काळात सुरळीत वीजपुरवठ्याची (Electricity Supply) खबरदारी घेतली जात आहे. ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन अकोला परिमंडळाच्या वतीने केले आहे.

Mahavitaran
Electricity : विजेचे रोहित्र वाहतुकीची जबाबदारी महावितरणचीच

वीज कर्मचाऱ्यांच्या संपात महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीतील एकूण २९ संघटनांचे कर्मचारी, अभियंते व अधिकारी सहभागी आहेत. अकोला, बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.

तसेच परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विभागीय स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे.

Mahavitaran
Electricity Bills : चालू वीजबिलांसह ५३५ कोटी रुपयांची थकबाकी

या कालावधीत वीजपुरवठा खंडित झाल्यास पूर्ववत होण्यास विलंब होण्याची शक्यता असल्याने ग्राहकांनी संयम पाळून सहकार्य करावे. ग्राहकांची गैरसोय होऊ नये, त्यांना तक्रार दाखल करता यावी, तसेच वीजवाहिनी तुटणे, शॉर्टसर्किट होणे आदींबाबत माहिती देण्यासाठी २४ तास नियंत्रण कक्ष सुरू ठेवण्यात आला आहे.

ग्राहकांनी सहनियंत्रण कक्षाच्या ७८७५७६३३३९ या नंबरवर, बुलडाणा जिल्ह्यातील ग्राहकांनी ७८७५७६३४८५ आणि वाशीम जिल्ह्यातील ग्राहकांनी ७८७५७६३२७६ यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com