Hivare Bazar News : हिवरे बाजारमध्ये गावकऱ्यांचे महाश्रमदान

Rural Development : नगर तालुक्यातील आदर्श गाव हिवरे बाजार येथे शुक्रवारी (ता. १२) गावकऱ्यांनी सुवर्णमहोत्सवी महाश्रमदान वर्ष साजरे करत श्रमदान केले.
Rural Development
Rural DevelopmentAgrowon

Nagar News : नगर तालुक्यातील आदर्श गाव हिवरे बाजार येथे शुक्रवारी (ता. १२) गावकऱ्यांनी सुवर्णमहोत्सवी महाश्रमदान वर्ष साजरे करत श्रमदान केले. हिवरे बाजारने ३३ वर्षांपूर्वी सुरू केलेले श्रमदान अविरत सुरू आहे.

या श्रमदानातून १९७२ च्या दुष्काळात करण्यात आलेल्या तलावाची दुरुस्ती सुरू केली आहे. या उपक्रमात जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासनातील अधिकारी, गावांतील महिला, नागरिक, तरुण, शाळकरी मुले मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.

राज्याच्या आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखाली आदर्श गाव हिवरेबाजार येथे शुक्रवारी (ता.१२) महाश्रमदान झाले. त्यात जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, मृद्‍ व जलसंधारण विभागाचे पांडुरंग गायसमुद्रे, उपवनसंरक्षक सुवर्णा माने, जिल्हा जलसंधारण अधिकारी एम. बी. शेळके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, प्रांताधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार रमेश शिंदे, गटविकास अधिकारी श्रीकांत खरात आदी सहभागी झाले.

Rural Development
Rural Development : गाव स्वच्छतेसाठी मजूर भरण्यास मान्यता नाही

श्रमशक्तीतून काय साकार होऊ शकते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हिवरेबाजार गाव आहे. महाराष्ट्र हे देशाला दिशा देणारे राज्य असून, हिवरेबाजारसारखी गावे महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम करत आहेत. हिवरेबाजारचे ग्रामविकासाचे मॉडेल इतर गावांत राबविल्यास गावे सुजलाम्‌ सुफलाम्‌ होतील, असा विश्‍वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Rural Development
Rural Development : कर्जत-जामखेड तालुक्यासाठी ‘एमआयडीसी’चे सकारात्मक पाऊल

पोपटराव पवार म्हणाले, ‘‘गावकऱ्यांना दुष्काळात जगविण्यासाठी पाझर तलावाचे काम करण्यात आले. तलावाच्या गळतीचे प्रमाण मोठे होते.

त्यासाठी पाठपुरावा करून महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री जलसंधारण योजनेतून कामास मंजुरी मिळविली. एक समृद्ध गाव स्वावलंबी झाले. गेली ३३ वर्षे अखंडपणे श्रमदान सुरूच आहे.

१९७२ मध्ये या तलावावर काम केलेल्या नानासाहेब पवार (वय ९०), अर्जुन पवार (वय ८०) यांच्यासह ग्रामस्थांच्या आठवणी जाग्या झाल्याने त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. हिवरेबाजारमधील संदीप ठाणगे याचा विवाह होता. नवरदेवाने बोहल्यावर चढण्यापूर्वी श्रमदान केले.

‘इतर गावांनी आदर्श घ्यावा’

हिवरेबाजार येथे पाझर तलावाच्या दुरुस्तीच्या कामात गावातील आजोबा, वडील आणि मुलगा, अशा तीन पिढ्या सहभागी झाल्या. ज्येष्ठ नागरिक, तरुण मंडळ व विद्यार्थी, तसेच महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या.

हिवरेबाजार येथील श्रमदानाचे इतर गावांनी अवलोकन करून आदर्श घेतला, तर इतरही गावे पाणीदार व स्वावलंबी होण्यास वेळ लागणार नाही,’’ असे मत जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी व्यक्त केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com