MIDC
MIDC Agrowon

Rural Development : कर्जत-जामखेड तालुक्यासाठी ‘एमआयडीसी’चे सकारात्मक पाऊल

नगर जिल्ह्यातील कर्जत, जामखेड तालुक्यांत औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) होण्यासाठी सकारात्मक पाऊस पडले असून, या भागाचे आमदार रोहित पवार यांनी नुकतीच उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन चर्चा केली.
Published on

Nagar News : नगर जिल्ह्यातील कर्जत, जामखेड तालुक्यांत औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) होण्यासाठी सकारात्मक पाऊस पडले असून, या भागाचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी नुकतीच उद्योगमंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांची भेट घेऊन चर्चा केली.

कर्जत, जामखेडच्या एमआयडीसीबाबत लवकरच अधिसूचना निघेल असे सामंत यांनी सांगितल्याचे आमदार रोहित पवार म्हणाले. कर्जत, जामखेडला एमआयडीसी झाल्यास रोजगार मिळण्याला मदत होणार आहे.

कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या औद्योगिक वसाहतीच्या उभारणीबाबत कायदेशीर बाबींना गती मिळावी आणि अधिसूचना जाहीर व्हावी यासाठी आमदार रोहित पवार यांनी नुकतीच उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली आहे.

मतदार संघात औद्योगिक वसाहत स्थापन होण्यासाठी त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात २०१९ मध्ये पहिल्याच हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला होता.

MIDC
MIDC Registration : सात-बारा उताऱ्यावरील ‘एमआयडीसी’ची नोंद अखेर रद्द

दरम्यान, सर्व बाबींचा विचार करून सर्वेक्षण करण्यात आले आणि दोन्ही तालुक्यांना मध्यवर्ती ठरणारी आणि दोन्ही तालुक्यांना मोठी एमआयडीसी मिळावी या अनुषंगाने कर्जत तालुक्यातील मौजे पाटेगाव व खंडाळा येथील जागेची निवड करण्यात आली.

१४ जुलै २०२२ च्या १४३ व्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत पाटेगाव व खंडाळा येथे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास अधिनियम १९६१ च्या तरतुदीनुसार लागू करण्यास समितीने मान्यता दिली.

मान्यता असताना देखील अजूनही या क्षेत्राची अधिसूचना झालेली नाही. ही बाब २०२२ च्या हिवाळी अधिवेशनातही पवार यांनी उपस्थित केली होती.

कर्जत, जामखेड अनेक लोक तालुक्याच्या बाहेर काम करतात. महाराष्ट्रात जशी बेरोजगारीची गंभीर समस्या आहे, तशीच परिस्थिती कर्जत, जामखेडला आहे. उच्चस्तरीय समितीने औद्योगिक वसाहतीसाठी परवानगी दिली असताना व अधिवेशनात आश्‍वस्त केले.

मात्र अजून परवानगी दिली नाही. आता सकारात्मकता दिसत असल्याने लवकर निर्णय होण्याची आशा आहे, असेही आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com