Railway Fund : महाराष्ट्राला रेल्वेसाठी दहा पट निधी दिला

पूर्वी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या अर्थसंकल्पातून दर वर्षी महाराष्ट्राला ११०० कोटी रुपये दिले जायचे. आता महाराष्ट्रासाठी ११ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
Raosaheb Danve
Raosaheb DanveAgrowon

नगर ः ‘‘देशात २०१४ नंतर रेल्वेच्या कामकाजात आमूलाग्र बदल झाला आहे. ‘वंदे भारत’ रेल्वेमध्ये (Vande Bharat Train) बसल्यास विमानात बसल्यासारखे वाटते. पूर्वी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या अर्थसंकल्पातून (Railway Budget) दर वर्षी महाराष्ट्राला ११०० कोटी रुपये दिले जायचे. आता महाराष्ट्रासाठी ११ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. म्हणजे १० पट जास्त निधी महाराष्ट्राला दिला, तरीही विरोधक महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली म्हणतात. हे योग्य नाही,’’ असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी सांगितले.

Raosaheb Danve
Agriculture Subsidy : शेततळे, रोपवाटिकेसाठी शेतकऱ्यांना मिळणार अनुदान

नगर येथे गुरुवारी (ता. १७) नगर-न्यू आष्टी डेमू रेल्वे सेवेचा प्रारंभ दानवे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. खासदार डॉ. सुजय विखे-पाटील, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, आमदार बबनराव पाचपुते, सुरेश धस, भाजप शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, रेल्वे विभागाचे आलोक सिंग आदी उपस्थित होते.

दानवे म्हणाले, ‘‘नगर-बीड-परळी रेल्वे सुरू व्हावी, ही जुनी मागणी होती. अनेक वर्षे हा मार्ग मंजूर होऊ शकला नाही. ज्येष्ठ नेते (कै.) गोपीनाथ मुंडे खासदार झाल्यावर आम्ही संसदेत हा प्रश्‍न मांडला होता. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना रेल्वे आहे. मात्र बीड जिल्ह्याला ती नसल्याचे सरकारच्या निदर्शनास आणून दिले.

अखेर नगर-परळी रेल्वेमार्गाला मंजुरी मिळाली. २६१ किलोमीटर मार्गापैकी ६६ किलोमीटर मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. बीडमधून रेल्वेद्वारे मराठवाड्याला कनेक्टिव्हिटी नव्हती. आता आष्टीवरून येणारी रेल्वे शिर्डी-मुंबई रेल्वे गाडीपूर्वी नगरमध्ये येईल. त्यामुळे मुंबईला जाता येईल. मात्र परळी रेल्वे पुणे, मुंबईपर्यंत जायला हवी. नगर-परळी मार्गाचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करू.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com