
Milk Rate : देशात दूध उत्पादनात महाराष्ट्राचा मोलाचा वाटा असून राज्यातील अनेक जिल्ह्यात दुधाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. दरम्यान मागच्या ५ वर्षातील दूध उत्पादनाची राज्याची आकडेवारी समोर आली आहे. दरम्यान केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या राष्ट्रीय सहकारविषयक माहितीकोषानुसार ही आकडेवारी काढण्यात आली.
यामध्ये महाराष्ट्रात एकूण ११,२१९ दूधउत्पादन घेणाऱ्या सहकारी संस्था आहेत. ही आकडेवारी जुलैपर्यंतची असल्याची माहिती एसीडीने दिली. राज्यात मागच्या पाच वर्षांत अहमदनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक दुधाचे उत्पादन घेण्यात आले आहे.
२०२१-२२ मध्ये महाराष्ट्रात शासकीय आकडेवारीनुसार एकूण १४ हजार ३०० टन दूध उत्पादन झाले असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र भारतीय कृषी संशोधन मंडळ (आयसीएआर)/ कृषी संशोधन आणि शिक्षण विभाग (डीएआरई) यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात विशेषतः महाराष्ट्रात कोठेही, नवीन दुग्धविकास विज्ञान/दुग्धविकास तांत्रिक महाविद्यालये सुरु/स्थापन करण्याबाबत नियोजन करण्यात पस्ताव नाही.
पशुपालन आणि दुग्धविकास विभागाकडून पशुंच्या स्वदेशी वाणांचा विकास आणि संवर्धन, गोवंशातील पशुंच्या समुदायाचे जनुकीय अद्यायावतीकरण करण्याचे काम राज्य आणि देशपातळीवर सध्या सुरू आहे. तसेच दुधाळ जनावरांतील दूध उत्पादन सुधारणा या उद्देशाने वर्ष २०१४ पासून देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय गोकुळ अभियान राबवण्यात येत असल्याची माहिती दूग्धविकास विभागाकडून देण्यात आली आहे.
२०२१ या काळात झालेले दूध उत्पादन टनामध्ये अहमदनगर २१९८.०, अकोला ९५.१५, अमरावती १९८.२०, औरंगाबाद ३४५.२०, बीड ३५६.९१, भंडारा १३५.५८, बुलढाणा १८०.७४, चंद्रपूर ६८.४०, धुळे २०१.८७, गडचिरोली ४४.९५, गोंदिया ९६.१८, हिंगोली ९६.४०, जळगाव ४७८.८६, जालना १६१.९७, कोल्हापूर १२१९.९२, लातूर ३०३.०९.
मुंबई २०.८६, नागपूर १७९.७१, नांदेड २९०.६१, नंदुरबार ९२.९६, नाशिक ८७८.९४, उस्मानाबाद ४७६.६७, पालघर १२५.६७, परभणी १३०.८७, पुणे १८६२.०९, रायगड ९७.३६, रत्नागिरी ६७.२०, सांगली ११०९.१५, सातारा ८६५.००, सिंधुदुर्ग ४२.६५, सोलापूर १४७४.७९, ठाणे १२४.६६, वर्धा ९०.४१, वाशीम ६४.०३, यवतमाळ १२९.३० एवढे उत्पादन झाले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.