sandeep Shirguppe
आपलं शरीर तंदुरुस्त आणि निरोगी ठेवायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला दररोज दूध पिण्याचा सल्ला दिला जातो.
आयुर्वेदानुसार दूध हा पूर्ण आहार मानला जातो. दुधाचे नियमित सेवन केल्याने शरीरास पोषक तत्त्वे मिळतात.
कॅल्शियम, मॅग्नेशियम, रायबोफ्लेविन, प्रोटिन यासारख्या अनेक पोषक घटकांचा यामध्ये समावेश असतो.
दरम्यान रात्री दूध पिण्याचे बरेच फायदे आहेत. निद्रानाश ही समस्या असेल तर रात्री झोपण्यापूर्वीच गरम दूध प्यावे.
गरम दूध पचण्यास हलके असते. त्यामुळे गरम दूध घेतल्याने पचनक्रिया सुधारते. शरीरावर येणारी सूज आणि अतिसार या समस्या दूर राहते.
गरम दूध प्यायलामुळे शरीराचं आर्द्रतेपासून संरक्षण होतं. थंडीच्या दिवसात चहा किंवा कॉफीचे सेवन गरम दूध फायद्याचं असतं.
अनेक संशोधनात प्रूव्ह झाले आहे की, सकाळच्या तुलनेत रात्री दूध प्यायल्याने अनेक हार्मोन्स इफेक्टिव्हली काम करतात.
दूधामध्ये Tryptophan असते जे बॉडी रिलॅक्स करते. यामुळे रात्री झोपण्याअगोदर दूध प्यायल्याने झोप चांगली येते.
रात्री दूध प्यायल्याने मेटाबॉलिज्म प्रोसेस फास्ट होते. यामुळे फॅट जलद बर्न होतात. असा निष्कर्ष मेडिकल कॉलेज ऑफ आक्सफोर्ड यूनिवर्सिटीने काढला आहे.