Shivraj Singh Chauhan : मध्य प्रदेशात शिवराजसिंह मुख्यमंत्रिपदाचा ‘चेहरा’ नकोत

मध्य प्रदेशातील यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने निश्चित केलेले ‘अबकी बार २०० पार’ हे लक्ष्य साध्य करण्याच्या रस्त्यात सत्ताधारी पक्ष संघटनेतूनच अडचणी येत आहेत.
Shivraj Singh Chauhan
Shivraj Singh ChauhanAgrowon

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी (MP Election) भाजपने (BJP) निश्चित केलेले ‘अबकी बार २०० पार’ हे लक्ष्य साध्य करण्याच्या रस्त्यात सत्ताधारी पक्ष संघटनेतूनच अडचणी येत आहेत.

Shivraj Singh Chauhan
Rahul Gandhi : भारत जोडोला प्रतिसाद मिळतो का ?

पक्ष सूत्रांच्या माहितीनुसार केंद्रात मंत्री असलेले ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya scindia) व त्यांच्या गटाच्या महत्त्वाकांक्षेने पुन्हा उचल खाल्ली असतानाच दुसरीकडे खुद्द भाजप आमदारांमध्येच ‘आगामी निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा पुन्हा मामा (शिवराजसिंह चौहान) नकोत’ असा जोरदार मतप्रवाह आहे.

Shivraj Singh Chauhan
Sharad Pawar : शरद पवारांचे शेतीमध्ये योगदान काय?

दरम्यान, जर चेहरा म्हणून आगामी रणधुमाळीत शिवराजसिंह नसतील व केंद्रीय नेतृत्वाला राज्यात भाजप-संघ रचनेतीलच नवा चेहरा द्यायचा असेल तर अलीकडे ‘दिल्ली’च्या विशेष जवळचे झालेले गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्यासह काही वरिष्ठ भाजप नेत्यांनी दावा ठोकला आहे.

केंद्रीय नेतृत्वाने राज्य नेत्यांना मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याच्या मुद्द्यावर भाष्य करण्यापासून दूर राहण्यास सांगितले आहे; मात्र भाजप नेतृत्वापर्यंत पोहोचलेले अहवाल सांगतात की बुंदेलखंड, ग्वाल्हेर-चंबळ, माला आणि महाकौशल यासारख्या काही प्रदेशांमध्ये गटबाजी रोखली गेली नाही तर पक्षाला गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com