Sharad Pawar : शरद पवारांचे शेतीमध्ये योगदान काय?

Anil Jadhao 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा आज जन्मदिन. शरद पवार यांचे शेतीक्षेत्रात भरीव काम आहे. 


पवारांचे शेती क्षेत्रातील योगदान समजून घ्यायचे असेल तर पवारांनी पहिल्यांदा आमदार झाल्यावर राबविलेली पाझर तलावांची मोहीम ते देशाचा कृषिमंत्री म्हणून घेतलेले धोरणात्मक निर्णय व्हाया राज्याचा कृषिमंत्री, मुख्यमंत्री, फळबाग योजना अशी प्रदीर्घ कामगिरी विचारात घ्यावी लागेल. 

शरद पवारांनी २००४ साली देशाच्या शेतीक्षेत्राचा कासरा हाती घेतला, मात्र त्याच वर्षी दुष्काळ पडला. नंतरच्या वर्षात आपल्याला गव्हाची आयात करावी लागली.

अमेरिकेच्या वायदेबाजारात गव्हाच्या किंमती वधारल्या. त्यावेळी भाजप खासदारांनी गव्हाच्या आयातीत म्हणजे सरकारी खरेदीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे आरोप केले होते.

गव्हाच्या उत्पादनात वाढ करायची वा अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण व्हायचं तर अन्नधान्याच्या आधारभूत किंमतीत घसघशीत वाढ करायला हवी, हा धोरणात्मक निर्णय पवारांनी घेतला. 

केवळ आधारभूत किंमत वाढवून, उत्पादन वाढवून भागणार नाही. वाढलेल्या उत्पादनाची निर्यातही झाली पाहिजे अन्यथा स्थानिक बाजारपेठेत दर पडतात. हे ओळखून पवारांनी वेळोवेळी निर्यातीस पूरक अशी धोरणे राबवली.

cta image