Monsoon Season : पावसाचा पहिला दीड महिना राहिला जेमतेम

Latest Rain Update : खरीप हंगाम हा पूर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. यंदा पावसाचा पहिला दीड महिना लोटला. मात्र, अद्यापही अनेक तालुक्यात सरासरी इतकाही पाऊस झालेला नाही.
Monsoon-Sowing Season
Monsoon-Sowing SeasonAgrowon

Akola News : खरीप हंगाम हा पूर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. यंदा पावसाचा पहिला दीड महिना लोटला. मात्र, अद्यापही अनेक तालुक्यात सरासरी इतकाही पाऊस झालेला नाही. काही तालुक्यात सरासरीच्या निम्माच पाऊस झाला आहे. गेल्या आठवड्यात एकदाच जोरदार सार्वत्रिक पाऊस यांचा सर्वात मोठा पाऊस ठरला आहे.

पावसाचा पहिला जून महिना जेमतेम राहला. यामुळे पेरण्यांना सुरुवातही होऊ शकली नव्हती. जुलै सुरू होताच कमी-अधिक प्रमाणात पावसाला सुरुवात झाली. याच पावसाच्या जोरावर शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू केल्या. अकोला जिल्ह्यात आतापर्यंत अकोट तालुक्यात केवळ सरासरी २४७ च्या तुलनेत १२२ मिली (४९.५ टक्के) पाऊस झाला आहे.

Monsoon-Sowing Season
Maharashtra Monsoon Session 2023 : बनावट बियाणे, खतांविरोधात कारवाईसाठी नवा कायदा करणार

तेल्हारा तालुक्यात सर्वांत कमी म्हणजे केवळ ९४ मिली पाऊस झाला. सरासरी २३८ च्या तुलनेत हा केवळ ४० टक्केच पाऊस पडला. तुलनेने बार्शीटाकळी तालुक्यात २११ मिली पाऊस झाला. सरासरी २६९ मिलीच्या तुलनेत ७८.५ टक्के नोंद आहे. याशिवाय बाळापूरमध्ये १५९ (६८.६ टक्के), पातूर १९१ (६३.३ टक्के), अकोला १७६ (६९ टक्के) मिलीमीटर, तर मूर्तिजापूर तालुक्यात १७० (६३.४) मिली पाऊस नोंद झाली आहे.

मलकापूरमध्ये सरासरी ओलांडली

बुलडाणा जिल्ह्यात पावसाच्या पहिल्या दीड महिन्यात असलेली २१८ मिली ही सरासरी मलकापूर तालुक्यात ओलांडली आहे. या तालुक्यात २२२.७ मिली (१०२.२ टक्के) पाऊस झाला आहे. या जिल्ह्यात संग्रामपूरमध्ये १२७ मिली (५१.७ टक्के) सर्वांत कमी पाऊस आहे.

Monsoon-Sowing Season
Maharashtra Monsoon Session 2023 : शेतकरी संकटात; सरकार मात्र सत्तेत मदमस्त

याशिवाय जळगाव जामोद ११५.१ (५४.७ टक्के) मिली, बुलडाणा १५४.५ (५२.६ मिली), चिखली १७८.६ (६३.५ टक्के), देऊळगावराजा १८६.१ (७८.७ टक्के), मेहकर २०४.७ (७१.७ टक्के), सिंदखेडराजा २१८.६ (८३.३ टक्के), लोणार २१०.८ (७६.४) खामगाव १७८ (८०.९ टक्के), शेगाव १८७.७ (९१.४ टक्के), मोताळा १६५.२ (७९.५ टक्के) आणि नांदुरा तालुक्यात १५०.२ (६५.७ टक्के) मिली पाऊस झालेला आहे.

मंगरूळपीर, कारंजामध्ये दमदार पाऊस

पावसाने वाशीम जिल्ह्यातील काही तालुक्यात चांगली हजेरी लावली आहे. प्रामुख्याने मंगरूळपीर तालुक्यात ३०३.७ (११५.४ टक्के) मिली पाऊस झाला. कारंजामध्ये ३०४.२ (१०३.५ टक्के), मालेगाव २५६.२ (८४.९टक्के), मानोरा २१८.८ (८०.५ टक्के), रिसोड १७८.३ (६०.१ टक्के) तर सर्वांत कमी १८६.९ (५४ टक्के) मिली पाऊस रिसोड तालुक्यात झाला आहे. वाशीम जिल्ह्यात पेरण्या शेवटच्या टप्प्यात आलेल्या आहेत. आजवरच्या पावसाने ही पेरणी साधली असून सोयाबीनची लागवड तीन लाख हेक्टरपर्यंत पोहोचली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com