Nashik Bribe News : नाशिकच्या जिल्हा उपनिबंधकांना ३० लाखांची लाच घेताना अटक

Bribe News : लाचखोर खरे यांच्या समवेत खासगी व्यक्तीलाही पथकाने ताब्यात घेतले आहे. यामुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
Bribe
BribeAgrowon
Published on
Updated on

Nashik Bribe News : जिल्ह्यात पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका चांगल्याच रंगल्या होत्या, मात्र निवडणुकीत तक्रारदार संचालकाविरोधातील सुनावणीमध्ये मदत करण्यासाठी ३० लाख रुपयांची लाच घेताना जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई कॉलेज रोडवरील खरे यांच्या निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी (ता. १५) रात्री केली. लाचखोर खरे यांच्या समवेत खासगी व्यक्तीलाही पथकाने ताब्यात घेतले आहे. यामुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

सतीश भाऊराव खरे (५७, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक वर्ग-१) रा. आई हाइट्स, कॉलेज रोड), ॲड. शैलेश सुमातीलाल सभद्रा (३२, रा. उर्वी अपार्टमेंट, सौभाग्यनगर, गंगापूर रोड) अशी दोघा लाचखोरांची नावे आहेत.

Bribe
Bribe News : कारवाईच्या भीतीने लाच घेणारा तलाठी पळाला

तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, नुकत्याच कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका पार पडल्या. जिल्ह्यातील एका बाजार समितीमध्ये तक्रारदार हे संचालकपदी कायदेशीर व वैधपणे निवडून आले आहेत.

त्यांच्या निवडीविरुद्ध उपनिबंधक खरे यांच्याकडे तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणावर सुनावणी घेण्यासाठी व निकाल संचालकाच्या बाजूने देण्यासाठी लाचखोर खरे आणि त्याचा एजंट सभद्रा यांनी तब्बल ३० लाख रुपयांची लाच मागितली होती.

लाचेची रक्कम घेऊन खरे यांनी तक्रारदारास सोमवारी (ता. १५) रात्री कॉलेज रोडवरील त्यांच्या राहत्या घरी बोलावले होते. त्यानुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचला आणि तक्रारदाराकडून तीस लाखांची लाच घेताना खरे व त्यांच्या साथीदारास लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली.

कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक नारायण न्याहालदे, उपाधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील, सुखदेव मुरकुटे, मनोज पाटील, अजय गरुड यांनी केली.

Bribe
Bribe News : लाचखोर ग्रामसेवकास रंगेहाथ अटक

घरझडती दरम्यान विभागाचे अपर अधीक्षक नारायण निहाळदे यांच्या मार्गदर्शनाखाली खरे यांच्या कॉलेज रोडवरील निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत झडती सुरू होती.

याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलिस यंत्रणेने घेतलेल्या झडतीत लाखो रुपये व सोने सापडल्याची प्राथमिक माहिती आहे.

‘खरे ठरले खोटे’

जिल्हा उपनिबंधक हे राजकीय नेत्यांच्या नेहमी संपर्कात असायचे. नेते व सहकार क्षेत्रातील अनेकांसाठी ते जवळचे होते. मात्र शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेत नसल्याने अनेकदा त्यांच्यावर सोशल मीडियावर यापूर्वी टीका झाली होती.

त्यातच आता त्यांनी लाच घेतल्यानंतर स्वतःला खरे म्हणून घेणारे ‘खरे आता खोटे ठरले’ असा संताप शेतकऱ्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com